#Lifestyle | रोज केस धुणं चांगलं की वाईट?

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : तुम्ही जर रोज केस धुवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसंच जर तुमचे केस रोज गळत असतील, किंवा केसांमध्ये कोंडा झाला असेल, किंवा मग केसांच्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल, तर मग तुम्ही हे वाचलंच पाहिजे.
नियमित केस धुतले पाहिजे का?
केस नियमित धुतल्यामुळे केसांच्या मुळावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला केसगळच्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. किंवा तुम्ही केसगळतीमुळे त्रस्त असाल, तर त्याचं मुख्य कारण कदाचित नियमित केस धुणं हे देखील असू शकतं. त्यामुळे दररोज केस धुणं टाळावं. केस हे एका धाग्याप्रमाणे असतात. जितक्या वेळा ते धुतले जाणार तितकेच ते निर्जीव दिसण्याची शक्यता अधिक असते. नियमित केस धुतल्यामुळे केस तुटण्याचं प्रमाणही वाढतं. 7 दिवसांतून फार फार तर दोन ते तीन वेळाच केस धुवावेत, असं तज्ज्ञ सांगतात.
केस दुभंगतात कारण…
डोक्यावर असणारी टाळूची त्वचा कोरडी राहू नये, यासाठी केसांवर तेलं लावण अतिशय गरजेचं आहे. मात्र केस रोज धुतल्यामुळे ही त्वचा कोरडी होते. केसांमधून नैसर्गिकरित्या तेलाचा स्त्राव होतो. केसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तेल अत्यंत महत्त्वाचं काम करतात. मात्र पाण्याने केस धुतल्यानं केसांवरील नैसर्गिक चमक नाहीशी होते. तसंच केस दुभंगण्याचीही दाट शक्यता असते.
…म्हणून केस लवकरच पांढरे होतात?
केस नियमित धुतल्यानं केसांचा रंगही हळूहळू बदलू लागतो. अनेकांचे केस कमी वयातच पांढरे होण्याचं मागेही हेच कारण आहे. केस पांढरे दिसू नयेत म्हणून अनेकजण रासायनिकयुक्त हेअर कलर किंवा हायलायटरचा वापर करतात. त्यामुळे केसांवर फार वाईट परिणाम होतो. केसांचा पोत खराब होऊन केसांची समस्या उद्भवते. म्हणून रासायनिकयुक्त हेअर कलरचा वापर टाळावा. शिवाय हेअर ड्राअर आणि इतर यंत्रांचाही वापर केसांवर करु नये. कारण त्यामुळे केस कमकुवत होतात. केस धुतल्यानंतर केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरल्यानं केस गळतीची समस्या येऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या केस सुकवण्यावर भर द्यावा. त्यामुळे केसांचं आयुष्य वाढेल. शिवाय केसांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.