पत्रकारिता अभ्यासक्रमात सिंधुदुर्ग लाईव्हचा डंका

Goan Varta Live | प्रतिनिधी
सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला. सिंधुदुर्ग लाईव्हच्या सबएडीटर जुईली पांगम आणि सिनिअर करस्पाँडंंट कृष्णा ढोलम यांनी यात घवघवीत यश प्राप्त केलय.
जुईली पांगम यांनी ९६ टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. कणकवली इथल्या सुप्रिया ठाकूर ९५. ५० टक्के गुणांसह द्वितीय, तर स्वप्नाली पांचाळ आणि गणेशप्रसाद गोगटे यांनी ९४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावलाय.
या परीक्षेसाठी २१ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी पास झाले असून १०० टक्के निकाल लागलाय.
असा आहे एकूण निकाल
या सर्व विद्यार्थ्यांना श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्राचे संयोजक, पत्रकार राजेश मोंडकर यांचं मार्गदर्शन लाभल. तसेच केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, अध्यक्ष अड दीपक नेवगी, कार्याध्यक्ष प्रवीण बांदेकर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं.