5 वर्षांखालील मुलांना आज ‘दो बुंद जिंन्दगी के’ जरुर द्या

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : संपूर्ण देशासह राज्या पोलिओचे डोस दिले जात आहेत. शाळा आणि आरोग्य केंद्रांवर पोलिओचे डोस दिले जात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासन पोलिओ डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. 5 वर्षांखालील मुलांना पोलिओचे डोस देणं नितांत गरजेचंय. त्यामुळे तुमच्या घरात किंवा आजुबाजूला जर ५ वर्षांखालील मुलं असतील त्यांना आठवणीनं पोलिओचे डोस देण्याचं आवाहन करायला विसरु नका.
राज्यात काही ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातूनही पोलिओ डोस दिले जात आहेत. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोलिस डोस आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन घ्यावे, असं आवाहन ५ वर्षांखालील मुलांच्या पालकांना आणि कुटुंबीयांना करण्यात आलं आहे.

पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. 24 ऑक्टोबर रोजी जगभरात पोलियोे निर्मूलन दिन साजरा केला जातो.
पोलियोवर कोणताही उपाय नाही. मात्र, योग्य वेळी लसीकरण केल्यास यापासून बचाव होऊ शकतो. भारतातून पोलियो हद्दपार झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मार्च 2014 मध्येच जाहीर केले असले तरी पाच वर्षांच्या आतल्या बाळांना पोलियोचा डोस देणे आवश्यक आहे.
म्हणून पोलिओ डोस पुढे ढकलले
देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीम पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आली. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. त्यामुळे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून राष्ट्रीय लसीकरण दिन (एनआयडी) किंवा “पोलिओ रविवार” म्हणून ओळखल्या जाणार्या पोलिओ लसीकरण दिनाचा कार्यक्रम ३१ जानेवारीला आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रपतींनी 30 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.45 वाजता राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ लसीचे थेंब देऊन पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाचा शुभारंभ केला. कोविड व्यवस्थापन आणि लसीकरण सेवा तसेच बिगर कोविड अत्यावश्यक आरोग्य सेवा एकमेकांवर विपरित परिणाम न होता सुरु राहाव्यात या आरोग्य मंत्रालयाच्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला होता.