नाकावाटे थेट मेंदूवर हल्ला करतो कोरोना? समोर आलं नवं संशोधन

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : कोरोनाबाबत नवं संशोधन समोर आलंय. या संशोधनामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. नव्या संशोधनामुळे कोरोना वायरस नाकावाटे शरीरात प्रवेश करुन थेट मेंदूवरही हल्ला करण्याची भीती व्यक्त करण्यात आला आहे.
जर्मनीतील बर्लिनमधल्या चारिटे युनिवर्सिटी मेडिसिन संस्थेनं नवं संशोधन केलंय. नेचर न्युरोसायन्स या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. या अभ्यासानुसार नाकावाटे कोरोना वायरल मेंदूत शिरकाव करु शकतो, असं म्हणण्यात आलंय.
कोरोनाच्या वायरसमध्ये सातत्यानं बदल नोंदवण्यात आले आहे. त्यातच एक नवी माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. या संशोधनामुळे संशोधकांनी भीती व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे फक्त मेंदूच नाही मज्जासंस्थेवरही कोरोना परिणाम करत असल्याचं बोललं जातंय. यामुळेच वास न येणं, चव जाणं, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि उलट्या होण्यासारखी लक्षणं दिसून येत असल्याचं सांगितलं जातंय.
काय होता अभ्यास?
संशोधकांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 33 जणांच्या मेंदूचा अभ्या केला होता. त्यात 22 पुरुष होते तर 11 महिलांचा समावेश होता. यात श्वसन नलिकेशी जोडलेल्या असलेल्या घशाच्या वरच्या भागाचं परिक्षण करण्यात आलंय.
कोविडची बाधा झाल्यानं बरे झालेल्यांना पुन्हा कोविड होण्याची भीती कायम आहे. चार दिवसांपूर्वी जीएमसीतील दोन डॉक्टरांना पुन्हा कोवडची लक्षणं दिसून आली आहेत. मात्र हे फेरइन्फेशन नसल्याचा दावा करण्यात आलाय. कोरोनातून बरे झाल्यानंतरही वायरल 90 दिवस शरीरात राहतो, असं एका अभ्यासातून समोर आलंय. मात्र रिकवर झाल्यानंतरही पुन्हा लागण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 17 दिवसांत माणून कोरोनातून बरा होऊ शकतो. याचा अर्थ तो व्हायरसमुक्त झाला असा होत नाही, असंही सांगितलं जातंय. त्यामुळे कोरोनातून बरं झाल्यानंतरही काळजी घेणं नितांत गरजेचं.
ग्रामीणपेक्षा शहरी भागात चिंता
दुसरीकडे राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय. मात्र शहरी भागात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. सहा शहरी भाहात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. उलट काही ठिकाणी तर लक्षणीय वाढ दिसून आली आङे. मडगाव, म्हापसा, पणजी, वास्को, फोंडा, कांदोळी या भागात कोविड रुग्णसंख्या सहाशेपेक्षा जास्तय.
फोंड्यात रुग्णसंख्या शंभरपेक्षा जास्त आहे. म्हापशात रुग्णसंख्या 50 पेक्षा कमी आहे. मडगावला रुग्णसंख्या 100 पेक्षा जास्त आहे. पर्वरीला रुग्णवाढीचं प्रमाण जास्त आहे. पणजीची रुग्णसंख्या आता शंभरच्या खाली आहे . वास्को चिंबल आणि कांदोळीची रुग्णसंख्याही हळूहळू कमी होतेय. या सगळ्यांच्या तुलनेत राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतंय.
रुग्णवाढीची चिंता
23 नोव्हेंबर पर्यंत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. पण 24 तारखेपासून हे प्रमाण बदललंय. रुग्णसंख्या वाढतेय. आणि रिकवर होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. नियमीत होणाऱ्या चाचण्यांची संख्याही वाढल्यानं हा बदल दिसून आलाय. वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येकानं काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जातेय.