#Lifestyle | हळद वापरून घ्या चेहऱ्याची अशी काळजी…

हेल्थ कॉन्शिअस असण्यापेक्षा हेल्थकेअरींग असणं केव्हाही चांगलं. त्यासाठी आहेत लाईफस्टाईलच्या खास टीप्स

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : हळद (turmeric) हा प्रत्येक घरात वापरला जाणारा व सहज उपलब्ध असणारा अन्नातील घटक. याचे अनेक फायदे आहेत. चेहर्‍याला तजेला येण्याबरोबरच चेहर्‍याची काळजी घेण्यासाठी हळदीचा कसा वापर केला जाउ शकतो, हे पाहुया…

चांगले दिसण्यासाठी कधी सौंदर्यप्रसाधनांचा वापर, तर कधी पार्लरची वाट धरली जाते. मात्र चेहरा दिर्घकाळासाठी चांगला व्हावा, असे वाटत असेल तर घरच्या घरी आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या हळदीचा फेसपॅक आपण वापरू शकतो. हा फेसपॅक पिंपल्सवर रामबाण ठरतो.

असा बनवा पॅक…
हळदीमध्ये एन्टी-बॅक्टीरियल पोषक तत्वे असल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेच चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स दूर करण्यासही मदत होते. शिवाय नैसर्गिक एंटीसेप्टिकमुळे चेहरा जास्त उजळतो. मुलतानी माती हळदीबरोबर लावल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो. हा पॅक बनविण्यासाठी मुलतानी माती, हळद आणि चंदन पावडर दुधामध्ये एकत्र करावे. चेहरा आणि मानेला हे मिश्रण लावून नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

लिंबासोबत हळद…
लिंबामध्ये नैर्सिगक ब्लींचिग तत्वे आहेत. हळद आणि लिंबाच्या मिश्रणामुळे चेहरा उजळदार आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होईल. अर्धा चमचा लिंबाचा रसाला हळदीमध्ये मिसळा. त्यानंतर एक थेंब गुलाबजल टाका. याचं मिश्रण व्यवस्थित करा अन् चेहऱ्यावर लावा. हे फेसपॅक वाळल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

मध आणि हळदीचे मिश्रण…
त्वचा फ्रेश राहण्यासाठी मधाचा वापर करता येऊ शकतो. त्वचेवरील जखम, व्रण आणि काळे डाग जाण्यास मध उपयोगी ठरतो. एक चमचा मधामध्ये हळद मिसळा. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कच्चे दूध टाकून चांगलं मिश्रण करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या.

दह्यासोबत अशी वापर हळद…
दह्यामध्ये रक्षात्मक तत्व आहेत, जे त्वचेला धूळ आणि मातीपासून संरक्षण देते. एका भांड्यात अर्धा चमचा हळदीसोबत दही मिसळा अन् फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक लावून १५ ते २० ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!