#Lifestyle | ग्रीन टी पित असाल तर हे वाचाच..

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण ग्रीन टी केव्हा प्यायला हवी? दिवसातून किती वेळा प्यायला हवी? ग्रीन टी पिण्याचे काही दुष्परिणाम तर नाहीत ना? यासोबत ग्रीन टी बाबत अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला तर मग सगळ्या शंका दूर करुयात.
ग्रीन टीचे अनेक प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ग्रीन टी कशी तयार करतात हे तुम्हाला माहित आहे का? ग्रीन टीचे अनेक प्रकार आहेत. जगभरात वेगवेगळे ग्रीन टीचे प्रकार उपलब्ध आहे. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन टीचं सेवन केलं जातं. मात्र ग्रीन टी बनवण्याची प्रकिया ही सगळी सामान्यच आहे.
चहाची पाने उन्हामध्ये किंवा वाफेचा उपयोग करून सगळ्यात आधी सुकवली जातात. त्यानंतर काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंगमध्ये ग्रीन-टी मार्केटमध्ये आणली जाते. यामध्ये गोड म्हणजेच स्वीटनर ग्रीन टी, टी बॅग, ग्रीन लीफ, ग्रीन-टी पावडर आणि ग्रीन-टी सप्लिमेंट्स अशा वेगवेगळ्या प्रकारात ग्रीन टी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ग्रीन टी कधी पिणं चांगलं?
1 सकाळी ग्रीन टी पिणं केव्हाची फायदेशीर, असं जर तुम्हाला कुणी सांगत असेल, तर त्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. सकाळच्या नाश्त्यामध्ये ग्रीन टीचा वापर चुकूनही करु नका.
2 नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर एका तासाने ग्रीन टीचं सेवन करावं. ग्रीन टीमुळे पचन आणि पचन प्रक्रिया चांगली होती. त्यामुळे आहारानंतर काही वेळाने ग्रीन टी पिणं केव्हाही चांगलं.
3 ग्रीन टीमुळे फ्रेश राहण्यास मदत होते. कारण ग्रीन टीमध्ये कॅफीन असतं. ग्रीन टी शरीराला सक्रिय ठेवण्यात मदत करते. मात्र ग्रीन टीचं अतिसेवन करणंही आरोग्यासाठी चांगलं नाही.
4 ग्रीन टीमुळे शरीराची चयापचायची क्षमता वाढते. याचा थेट परिणाम शरीराच्या वजनावर होतो. म्हणूनच अनेकजण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचं सेवन करतात. ग्रीन टीमधील घटकांमुळे शरीराचं वजन नियंत्रणात राहतं, असा दावा अनेक तज्ज्ञ करतात.