#Lifestyle | ‘या’ बहुगुणी फळाचे आहेत अनेक फायदे…

हेल्थ कॉन्शिअस असण्यापेक्षा हेल्थकेअरींग असणं केव्हाही चांगलं. त्यासाठी आहेत लाईफस्टाईलच्या खास टीप्स

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : एकाच फळाचे सेवन केल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात, हे वाचून तुमची जिज्ञासा नक्कीच चाळवली असेल. चला तर मग बघू आवळा हे बहुगुणी फळ कसे आरोग्यदायी आहे ते…

आवळा आकाराने लहान असला, तरीही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वांचा समावेश असतो. कोणत्याही हंगामामध्ये याचे सेवन केले जाऊ शकते. कच्चे आवळे केवळ हिवाळ्यातच मिळतात. पण आवळ्याचा रस, कँडी, चूर्ण, मोरावळा बाजारात सहज उपलब्ध असतो. यामुळे तुम्ही वर्षभर आवळ्याचे सेवन करू शकता. आवळ्यापासून तयार केलेले पौष्टिक पदार्थ आयुर्वेदिक दुकानांमध्येही मिळतात. शरीरातील चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठीही आवळ्यातील घटकांची मदत होते. याव्यतिरिक्त आवळ्याचे अन्य आरोग्यदायी लाभ देखील आहेत.

शरीराला मिळते ऊर्जा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. हे घटक आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करतात. सोबतच शरीराचा मेटाबॉलिक रेट संतुलित ठेवण्यासही मदत करतात. परिणामी शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही. आवळ्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीर फिट राहण्यास मदत मिळते. बहुतांश आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून आवळा खाण्याचे सल्ला दिला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह असते. हे दोन्ही घटक शरीरासाठी पोषक आहेत.

​विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात
आवळ्याचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये समावेश केला जातो. पोषक गुणधर्मांमुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते. यामुळे पचन संस्थेमध्ये विषारी पदार्थ जमा होत नाहीत आणि चयापचयाची क्षमता देखील सुधारते. चयापचयाची क्षमता चांगली असल्यास आपल्याला योग्य प्रमाणात भूक देखील लागते. तसंच वारंवार भूक लागण्याची समस्याही नियंत्रणात येण्यास मदत मिळते.

​​आवळा कँडी
फूड स्टोअर्समध्ये आवळा कँडी गोड अथवा मसालेदार स्वरुपात उपलब्ध असते. काही जण तोंडाला चव येण्यासाठी, तर काही जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवळा कँडीचे सेवन करतात.

कच्चा आवळा
ऑर्गेनिक फूड आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये आवळ्याचा रस उपलब्ध असतो. या रसाचे कसे आणि किती वेळा सेवन करायचे, याबाबत तज्ज्ञांकडूनच माहिती घ्यावी. आरोग्यासाठी आवळा कँडीच्या तुलनेत कच्चे आवळे आणि त्याचा ताजा रस कधीही पोषक असतो. डॉक्टर देखील नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असणारा आवळा खाण्याचा सल्ला देतात. आवळ्याची पौष्टिक भाजी आणि लोणचे देखील घरच्या घरी तयार करता येते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!