ALERT! पेट्रोल भरताना तुमची अशी होते फसवणूक!

विविध प्रकारे केली जाते ग्राहकांची फसवणूक.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः देशातील सामान्य वाहनचालक नेहमी एका समस्येचा सामना करत असतात. असे अनेक पेट्रोल पंप भारतात आहेत जे दिलेल्या पैश्याचा मोबदल्यात कमी इंधन देऊन तुमची फसवणूक करतात. जर तुम्ही सतर्क नसाल तर तुमची हमखास फसवणूक करण्यात येते. आज तुम्हाला अशा घोटाळ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने पेट्रोल पंपाचे मालक सामान्य चालकांची फसवणूक करतात.

विविध प्रकारे ग्राहकांची होते फसवणूक

एकाच पद्धतीने नव्हे, तर अनेक पद्धतीने पेट्रोल पंपवर ग्राहकांची फसवणूक केली जाते. तुमची फसवणूक झाली आहे हे बऱ्यादा तुमच्या लक्षातही येत नाही.

१) द लॉन्ग होज –

ही खरंतर ग्राहकांची फसवणूक नाही. डिस्पेन्सरच्या डिझाईनमधला दोष आहे. अनेक इंधन डिस्पेन्सर मध्ये hoses अर्थात नलिका गरजेपेक्षा अधिक लांब असतात. जेव्हा गाडीत आपण इंधन भरतो तेव्हा बरचसं इंधन त्या नलिकेतच राहून जातं. जवळ जवळ १०० ते १५० मिली इंधन त्या नलिकेत राहून जातं. त्यामुळे शेवटचा थेंब टाकीत पडेपर्यंत लक्ष आपलं लक्ष असलं पाहिजे.

२) The sleight of Hand, Shortchanging Trick :

बऱ्याचदा वाहनचालक घाईत असतो. याचा फायदा घेऊन कमी दराचं इंधन गाडीत भरण्यात येतं. म्हणजे ५०-६०-१०० रुपयांपर्यंतचं इंधन तो गाडीत भरतो. बऱ्याचदा सुट्टे पैसे नसल्याने आपण ५०० ची नोट देतो. मग उरलेले पैसे परत करण्याच्यावेळी सुट्टे पैसे पूर्णपणे परत केले जात नाहीत. आधीच घाईत असलेला वाहनचालक पैसे न मोजताच खिशात ठेवून निघून जातो. अशाप्रकारची फसवणूक पेट्रोल पंप चालकांकडून मोठ्या प्रमाणात होत असते. सामन्यत : दुचाकीचालक याचे शिकार होतात.

३) The Diversionary Trick :

बऱ्चयादा पेट्रोल पंपावर आपण विशिष्ट किमतीचं इंधन गाडीत टाकायला सांगतो. त्याचवेळी पेट्रोल पंपावरील दुसरा कर्मचारी आपल्या जवळ येतो आणि आपल्याला वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती सांगू लागतो. कुठल्यातरी भलत्याच विषयावर आपल्याशी संवाद साधतो. जेणेकरून आपलं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं. त्याचवेळी इंधन भरणारा कर्मचारी शिताफीने, पूर्ण इंधन भरायच्या आधीच डिस्पेन्सर बाजूला करतो. समजा तुम्ही १००० रुपयांचे पेट्रोल गाडीत भरायला सांगितलं, तर फक्त ९५० रुपयांचं पेट्रोल प्रत्यक्षात गाडीत भरलं जातं. आता मात्र, इलेक्ट्रॉनिक बिल मिळत असल्यामुळे हा प्रकार कमी झाला आहे. हा प्रकार बऱ्यापैकी थांबला असला तरी ज्याठिकाणी अशी बिलिंग यंत्रणा नाही तिथे सामान्यांची फसवणूक आजूनही केली जात आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा बिल घ्यायला विसरू नका.

४) The Double Start Trick :

तुम्ही १००० रुपयांचं इंधन पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला भरायला सांगितलं, तर तो व्यवस्थित ऐकू न आल्याचं कारण देत फक्त ३०० रुपयांचं पेट्रोल भरेल. जेव्हा तुम्ही त्याला १००० रुपयांचं पेट्रोल भरायला सांगाल, तेव्हा तो मशीन रिसेट करण्याचं कारण देत तुमचं लक्ष भरकटवेल आणि ७०० पर्यंतच पेट्रोल गाडीत भरेल. तुम्हाला वाटेल की त्याने पूर्ण १००० रूपयांचं पेट्रोल गाडीत भरलं आहे. परंतु त्याने तुमची फसवणूक करून केवळ ७०० रुपयांचे पेट्रोल गाडीत भरलेले असेल. हा सुद्धा ध्यान भरकटवण्याचा प्रकार आहे. यात देखील २ लोक सामील असतात. अशा युक्तीला अजिबात बळी पडू नका.

५) The Jerky Stop Start Trick :

पंपावरचे कर्मचारी पेट्रोल भरताना नलिका पूर्णपणे लॉक करत नाहीत. याऐवजी गाडीच्या टाकीत पेट्रोल भरत असताना बंद चालू करत असतात. नॉब दाबल्यावर इंधन बाहेर येते. काहीवेळाने नॉबवरील दाब कमी करून प्रवाह कमी करतात. नंतर पुन्हा चालू करतात. याप्रकारामुळे, प्रत्येक १० लिटर मागे १५०-२०० मिली इंधन चोरलं जातं.

६) The Continuity Trick :

प्रत्येक नवीन गाडीत पेट्रोल भरण्यापूर्वी मशीन रिसेट होणे गरजेचं असतं. पंप कर्मचारी यातच चापलुसी करतात. तुमच्याआधी येणाऱ्या दुचाकीस्वाराने थोड्याच किमतीचं पेट्रोल भरलं असेल, तर मशीन रिसेट न करता तिथूनच तुमच्या गाडीत पेट्रोल भरायला सुरुवात करतात. समजा तुम्ही ५०० इंधन भरायला सांगितलं, तर तो आधीच्या १०० पासून सुरुवात करून फक्त ४००चं पेट्रोल गाडीत भरलं जातं. १०० रुपयांची फसवणूक होते. ही सुद्धा एक लक्ष भरकटवून केली जाणारी युक्ती आहे.

७) Dispenser Tampering :

पेट्रोल डिस्पेन्सर यंत्रणा tampering करणं नव्या तंत्रज्ञानामध्ये कठीण झालं आहे. त्यामुळे हा धोका टळतो. ही एक चांगली बाब आहे. प्रत्यक्ष दिलेल्या रकमे इतकीच रक्कम मीटर दाखवते. पण पेट्रोल मात्र कमी भरलं जातं. ग्राहकांची फसवणूक केली जाते. आजही काही प्रमाणात ही फसवणूक केली.

हेही वाचा – गाडीवर काळी काच लावताय.. तर ही बातमी वाचाच…

या फसवणुकीपासून स्वतःला कसं वाचवायचं?

१) नेहमी छापील बिलाची मागणी पेट्रोल पंप चालकाकडे करत जा
२) इंधन नेहमी प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त पंपावरूनच भरा
३) इंधन भरताना नेहमी वाहनावरून उतरून मीटर व्यवस्थित चेक करा.
४) नेहमी वाहनासोबत राहा. नेहमी मीटरवर बारीक लक्ष ठेवा. लक्ष भरकटू देऊ नका.
५) तुम्ही आधीच सेट केलेल्या किंमतीचं इंधन भरत असाल, तर कर्मचाऱ्याला ते डिस्पेन्सरमध्ये लोड करायला लावा. नलिका गाडीत टाका व्यवस्थित लॉक करा आणि बाजूला सरकुन घ्या, ते स्वयंचलित यंत्र आहे भरल्यावर ते आपोआप थांबेल.

हेही वाचा – ८ वर्ष जुनी गाडी वापरत असाल तर ही बातमी वाचाच!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!