जाणून घ्या पश्चिम नमस्कारासनाचे फायदे

पश्चिम नमस्कारासनाचे फायदे

Goan Varta Live | प्रतिनिधी


योग हा माणसाच्या आरोग्याच्या द्दष्टीने महत्वाचा मानला जातो.योगासनाचा सराव माणसाच्या शरीराला तंदुरूस्त बनवतो.योगप्रक्रियेत विविध नमस्कारासनाला महत्व दिले आहे.पश्चिम नमस्कारासन हे यापैकी एक आहे.या आसनामुळे शरिराची पचन क्षमता वाढते आणि तणावापासून मुक्ती मिळते. या आसनाला इंग्रजीत रिवर्स प्रेयर पोझिशन असे म्हटले जाते. हे आसन करताना हात पाठी मागे नेऊन हातांनी नमस्कात मुद्रा करायची असते.

नमस्कारासनाचे फायदे

पाठ आखडल्यास पश्चिन नमस्काराचा सराव लाभदायक आहे. या आसनामुळे आखडलेली पाठ मोकळी होते आणि शरिराला आराम मिळतो.ज्या लोकांना व्यायाम केल्यानंतर खांदे किंवा पाठीच्या वेदना होतात त्यांच्यासाठी हे आसन आरामदायक ठरते. पश्चिम नमस्कारासनामुळे वजन घटण्यास फायदा होतो. तसेच पाठ, खांदे आणि हातीची चरबी कमी होण्यास मदत होते आणि स्नायुंची ताकद वाढून त्यांना आराम मिळतो.सतत कॉम्प्युटर समोर बसून बोटं आणि मंगटांवर तणाव येतो त्यामुळे या आसनाचा सराव केल्यालं आराम मिळतो.

नमस्कारासन करण्याची प्रक्रिया

जमीनीवर चटई अंथरून दोन पायांत अंतर ठेवून आरामदायक स्थितीत उभे राहावे. हात हलके सोडावेत, त्यानंतर गुडघे वाकवत हात मागच्याबाजूने घेवून जावे आणि एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करावा.दीर्घ स्वस घेत मनगटं वाकवून हात मणक्यापाठीमागे ठेवावेत.पाठ सरळ असावी आणि हात जोडून नमस्कार मुद्रा करावी. या मुद्रेत २०-३० सेकंद थांबावे आणि नंतर डोळे बंद करावेत.हे आसन दिवसाला ४-५ वेळा करावे

हेही वाचा

डाळिंबामुळे ‘या’ शारीरिक तक्रारी होतील दूर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!