शाकाहारी लोकांमध्ये फ्रॅक्चरचा धोका?

कॅल्शियमच्या अभावामुळे माणसाला निरनिराळ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतं.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरोः शरीराला निरोगी ठेवण्यासाठी त्याला योग्य प्रमाणात पोषक तत्व नियमित मिळणं फार गरजेचं आहे. कॅल्शियम हे एक असं रासायनिक तत्व आहे, ज्यामुळे माणसाच्या शरीरातील हाडे मजबूत राहतात. आहारातील अनेक पदार्थांमधून आपल्या शरीराला कॅल्शियमचा पूरवठा होत असतो. कॅल्शियमच्या अभावामुळे माणसाला निरनिराळ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतं. जर तुम्हाला सतत अंग दुखी, अथवा थकवा जाणवत असेल, तर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते. यासाठीच कॅल्शियम युक्त आहार घेणं आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचा आहे, ते आपण पाहणार आहोत. आपल्या भारतीय आहारात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत, ज्यामुळे आपल्याला भरपूर कॅलशियम मिळू शकतं. म्हणूनच आम्ही तुम्हाला कॅल्शियमयुक्त आहार आणि कॅल्शियमच्या कमतरतेबाबत सर्व काही सांगत आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल.

शाकाहारी जीवनशैली चांगलीच, पण…

शाकाहारी जीवनशैली स्वीकारण्याचे अनेक फायदे असले, तरी शाकाहारामुळे तुम्हाला फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त आहे, हे तुम्हाला माहित आहे का? एका नवीन अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, कॅल्शियम, जस्त, बी १२ जीवनसत्त्व, प्रथिने अशी काही पोषक तत्वे शाकाहारी आहारात कमी असू शकतात, ज्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त संभावतो.
बीएमसी (बायोमेड सेंट्रल) ने त्यांच्या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित केलेला. तुलनात्मक अभ्यासात असे आढळून आले की, मांस आणि मासे खाणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारी माणसांमध्ये शरीराला लागणारे पुरेसे कॅल्शियम आणि प्रथिने यांचा अभाव असतो. त्यांच्यामध्ये हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका ४३ टक्के अधिक असतो. नितंब, पाय आणि मणका या साईट-स्पेसिफिक फ्रॅक्चर्सची शक्यताही या श्रेणीत वाढते.

एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. टॅमी टोंग सांगतात…

ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूट्रिशनल एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. टॅमी टोंग यांच्या म्हणण्यानुसार, “शाकाहारी लोकांमध्ये एकूणच फ्रॅक्चर होण्याचा धोका अधिक असतो. ज्यामुळे मांस खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत १० वर्षांच्या कालावधीत दर एक हजारामागे फ्रॅक्चरच्या सुमारे २० अधिक केसेस आढळून आल्यात.”

एपिक-ऑक्सफर्ड अभ्यास

एपिक-ऑक्सफर्ड अभ्यासात संशोधकांनी ५५,००० लोकांचे परीक्षण केले. ५४,८९८ सहभागींपैकी २९,३८० मांस खाल्लेले, ८,०३७ मासे खाल्लेले (पण मांस खाल्लेले नाहीत), १५,४९९ शाकाहारी होते आणि १,९८२ व्हेगन होते. सर्वप्रथम १९९० ते २००१ दरम्यान आणि नंतर २०१० मध्ये पुन्हा विश्लेषण केले. फ्रॅक्चरच्या धोक्याचे मूल्यमापन करण्यासाठी २०१६ पर्यंत त्यांचा अभ्यास करण्यात आला.

अभ्यासादरम्यान ३,९४१ फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले…

९४५ नितंब, ८८९ मनगटे, ५६६ हात, ५२० घोटे, ३६६ पाय आणि इतर मुख्य ठिकाणी (क्लॅव्हिकल, रिब्ज आणि मणके) ४६७ फ्रॅक्चर झाले. बीएमआय, आहारातील कॅल्शियम आणि आहारातील प्रथिनांचे सेवन या निरीक्षणांना कारणीभूत होते.

शाकाहार करणार्‍यांमध्ये फ्रॅक्चरचा धोका जास्त…

“या अभ्यासात असे दिसून आले की, मांस खाणाऱ्यांपेक्षा सरासरी बीएमआय तसेच कॅल्शियम आणि प्रथिनांचे सेवन कमी असलेल्या शाकाहारी लोकांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर होण्याचा धोका अधिक होता.” असे डॉ. टोंग म्हणाल्या. त्यांनी कबूल केलं की, वनस्पतींवर आधारित आहार संतुलित असल्यामुळे पोषक तत्त्वांची पातळी सुधारू शकते आणि हृदयरोग आणि मधुमेहासह रोगांचा धोका कमी होऊ शकतो.

कॅल्शियम मिळविण्यासाठी आहाराचा याचा समावेश करा…

कॉडलिव्हर तेल , शार्कलिव्हर तेल, सामन, हॅलीबट असे मासे हे कॅल्शियम आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी दुध, तूप, लोणी हे पदार्थ कॅल्शियमचे मुख्य स्त्रोत आहेत. पण एकूणच शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थातून कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!