बटाटे फ्रीजमध्ये ठेवणे ठरू शकते घातक
बटाटे खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवले जातात. मात्र, ही कृती आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते.

महेश दिवेकर | प्रतिनिधी
पणजी : बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यातल्या स्टार्चचं रुपांतर साखरेत होतं. हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. फ्रीजमधले बटाटे खाल्ल्यामुळे कर्करोगासारखी दुर्धर व्याधीही जडू शकते.
बटाट्यातल्या साखरेचा यातल्याच अमिनो ऍसिड ऍस्परॅगनशी संपर्क होऊन ऍक्राइलामाइड नावाचं घातक रसायन तयार होतं. हे रसायन आरोग्यासाठी खूपच घातक ठरतं.
फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे शिजवल्यानंतर त्यात ऍक्राइलामाइड रसायनाची निर्मिती होऊ लागते. हे रसायन पोटात गेल्यानंतर बराच त्रास होऊ शकतो. त्यामुळे बटाटे कोरड्या जागी ठेवायला हवेत.
ऍक्राइलामाइड हे रसायन स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये आढळतं. उच्च तापमानावर शिजवलेल्या स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये या रसायनाची निर्मिती होते. हे रसायन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतं.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.