थंडीच्या दिवसात गाजर खाताय ना? हे आहेत गाजर खाण्याचे खास फायदे

हेल्थ कॉन्शिअस असण्यापेक्षा हेल्थकेअरींग असणं केव्हाही चांगलं. त्यासाठी आहेत लाईफस्टाईलच्या खास टीप्स

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : थंडीचे दिवस सुरु होत आहेत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात गाजरांची आवाक वाढते. अनेक घराघरांमध्ये गाजरापासून अनेक विविध पदार्थ तयार केले जातात. यामध्ये गाजराची कोशिंबीर, गाजराचं लोणचं, गाजराचा हलवा किंवा गाजराचे पराठे असे अनेक पदार्थ तयार केले जातात. महत्त्वाचं म्हणजे चवीला गोडसर असलेल्या गाजरापासून केलेला कोणताही पदार्थ हा चविष्ट लागतो. गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे खासकरुन थंडीच्या दिवसांत बाजारामध्ये गाजरं दिसू लागल्यावर त्याचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. नेमके काय आहेत गाजर खाण्याचे फायदे, ते आज जाणून घेऊयात..

गाजर खाण्याचे काही खास फायदे

१. गाजर खाल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे कोरोना काळात गाजर खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. विशेष म्हणजे थंडीच्या काळात गाजर खाल्यानं इम्युनिटी वाढते, असाही सल्ला दिला जातो.

२. गाजर खाणं पचनक्रियेसाठी चांगलं असलं. गाजर खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते, असं जाणकार सांगतात. त्यामुळे आहारात गाजराचा वापर केल्यास फायदा होतो.

३. गाजर डोळ्यांसाठी फार महत्त्वाचं खाद्य आहे. गारज खाल्यानं डोळ्यांचं आरोग्य चांगले राहतं.

४. फास्ट फूड खाऊन वजन वाढवण्यापेक्षा गाजर खाण्याला भर दिला पाहिजे. कारण गाजर खाल्यानं वजन वाढत नाही. उलट शरीराच्या इतर अवयवांना प्रचंड फायदा होतो.

५. गाजर खाल्यानं शरीरात उब निर्माण होते, असंही जाणकार सांगतात.

६. अशक्तपण जाणवत असेल तर गाजर खावं. कारण गाजराच्या रसामुळे अशक्तपणा दूर होतो. लहान मुलांना थंडीच्या दिवसात गाजर देणं हे अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं.

७. हदयाशसंबंधित आजार कमी होतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.