आणखी आठ जणांचा मृत्यू

नवे ५९० करोनाबाधित; ७३६ जणांची मात, सक्रिय बाधितांची संख्या ५,५१३ झाली आहे.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी


पणजी :
चोवीस तासांत आणखी आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या 368 झाली आहे. नवे 590 बाधित आढळले असून, तब्बल 739 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या 5,513 झाली आहे.
सांतइनेज येथील 69 वर्षीय महिला आणि 69 वर्षीय पुरुषाचा चोवीस तासांत मृत्यू झाला. याशिवाय वास्को येथील 69 वर्षीय पुरुष, चांदोर येथील 60 वर्षीय पुरुष, सांतइस्तेव्ह येथील 83 वर्षीय महिला, कणकवली येथील 32 वर्षीय युवक, वाळपई येथील 87 वर्षीय पुरुष व मांगोरहिल येथील 79 वर्षीय महिलेचेही निधन झाले. पाच जणांचा गोमेकॉत, दोघांचा मडगाव येथील कोविड इस्पितळात, तर एकाचा चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला. सर्वांना इतर गंभीर आजारही होते, अशी माहिती आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालातून दिली आहे.
आतापर्यंत 29,343 करोनाबाधित सापडले असून, त्यांतील 23,462 जण करोनामुक्त झाले आहेत. घरी अलगीकरणात राहण्याचा पर्याय आणखी 290 जणांनी स्वीकारला. त्यामुळे सद्यस्थितीत घरी अलगीकरणात असलेल्यांची संख्या 12,782 आहे. पणजीत दोन दिवसांत 35 नवे बाधित आढळले आहेत. पणजीतील सक्रिय बाधितांची संख्या 315 झाली आहेत, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!