आयसीयूमधील कोरोना रुग्णांना किडनी फेल होण्याचा धोका अधिक

90 टक्के रुग्णांना आजाराची माहितीच नसते

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोनापासून मुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये किडनी डॅमेज होण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची किडनी निकामी होत असल्याची कोणतीही लक्षणे त्यांच्यात दिसून येत नाही, असा दावा अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. आयसीयूमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या काही रुग्णांमध्ये किडनी डॅमेज होण्याचे सौम्य लक्षणे दिसून आले आहेत, असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

1 सप्टेंबर रोजी अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीमध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार कोरोनातून बरे झाल्यानंतर ज्या रुग्णांना धमन्यांमध्ये त्रास झाला, त्यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर किडनीचा त्रास सुरू झाल्याचं दिसून आलं. संक्रमणानंतर आयसीयूमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांमध्ये किडनी फेल होण्याचा धोका अधिक आहे, असं वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे संशोधक जियाद अल-अली यांनी सांगितलं. सेंट लुईस हेल्थ केअर सिस्टिम आणि वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अमेरिकेतील फेडरल हेल्थ डाटाचं विश्लेषण केलं. त्यात त्यांना कोरोनाच आजार दीर्घ काळापासून असलेल्यांची किडनी डॅमेज होत असल्याचं दिसून आलं.

90 टक्के रुग्णांत लक्षणे नाही

किडनीचा आजार असलेल्यांमध्ये साधारणपणे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. किडनीच्या आजाराशी झुंज देणाऱ्या 90 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. 3.7 कोटी अमेरिकन याच परिस्थितीतून जात आहेत, असं नॅशनल किडनी फाऊंडेशनने म्हटलं आहे. किडनीचा आजार असलेल्यांमध्ये 70 ते 80 टक्क्यापर्यंत किडनी हळूहळू काम करणं बंद करते, तोपर्यंत या रुग्णांना किडनीचं कार्य बंद होत असल्याचं समजत नाही. यातील काही लक्षणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उदा. यूरिनमध्ये प्रोटीनचं स्तर वाढणं, पाय, टाचा आणि डोळ्यांच्या चारही बाजूंना सूज येणं, छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं.

किडनी फेल होणार नाही याची काळजी कशी घ्याल?

सीडीसीच्या मते, तुमचे ब्लड प्रेशर 140/90 पेक्षा कमी ठेवा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ब्लड प्रेशर टार्गेटची माहिती घ्या. खाण्यामध्ये मीठाचा वापर कमी करा, फळे, भाजीपाल्याचा आहारात समावेश करा. त्याशिवाय एक्टिव्ह राहा आणि कॉलेस्ट्रॉलची रेंज कायम ठेवा. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे सुरू ठेवा.

तुमची किडनी फेल झाल्यास तुम्हाला डायलिसिसच्या ट्रीटमेंटची गरज असते. अशावेळी किडनी निरोगी ठेवणं आणि किडनी निकामी होण्यापासून वाचवणं महत्त्वाचं आहे. जर त्रास अधिक असेल तर क्रोनिक किडनीच्या आजाराचा तपास करत राहा. प्राथमिक चाचण्यांमध्ये आजार दिसून आल्यास लगेच उपचाराला सुरुवात करा.

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर प्रत्येक वर्षी रक्त आणि युरीनची टेस्ट करा. त्यामुळे ब्लड शुगर रेंजमध्ये आहे की नाही याची माहिती मिळेल. एकाच जागी बसून राहण्याची सवय लावून घेऊ नका. एक्टिव्ह राहा. कारण फिजिकल एक्टिव्हिटी ब्लड शुगरचा स्तर कंट्रोलमध्ये आणण्यात मदत करतो.

लठ्ठपणाही अडचणीचं कारण बनू शकतो. तुमचं वजन अधिक असेल तर ते कमी करा. स्मोकिंग करत असाल तर तात्काळ ही सवय सोडा. तुम्हाला क्रोनिक किडनीचा आजार असेल तर डायटिशियनला भेटून किडनी निरोगी राहण्यासाठी फूड प्लान तयार करून घ्या.

स्वत:चा कसा बचाव करणार?

कोरोना रुग्णांनी वेळोवेळी किडनीचं आरोग्य तपासण्यासाठी वारंवार क्रिएटिनिन टेस्ट केली पाहिजे. तसेच किडनीची कार्यप्रणाली व्यवस्थित सुरू आहे की नाही याचा तपास करण्यासाठी eGFR टेस्ट करून शकता.

हा व्हिडिओ पहाः COVID 19 | केरळात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्यानं खबरदारी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!