दुर्दैवी! कुडाळच्या वृद्धाश्रमात करोनाचं थैमान
29 ज्येष्ठांना लागण झाल्यानं खळबळ

Goan Varta Live | प्रतिनिधी
कुडाळ : येथील संविता आश्रमातील 29 ज्येष्ठ कोरोना सक्रिय आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कांबळे यांनी याला दुजोरा दिला आहे.
या आश्रमात एकूण 116 वयोवृद्ध राहतात. आतापर्यंत 29 लोकांचे अहवाल सक्रिय आले आहेत. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते, तर उर्वरित सर्वांचे अहवाल घेणे चालू आहे. यापैकी 10 लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर बाकी 19 जणांना तेथेच क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कांबळे यांनी दिली.
आश्रमाचे संचालक संदीप परब यांनी ही माहिती खरी असल्याचे सांगितले. या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे, कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदेश कांबळे यांनी भेट दिली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.