थंडीत तुमच्या डाएटमध्ये ‘हे’ फळ नक्की ठेवा

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास खूप चागंले फायदे होतात.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः हिवाळ्यात बाजारात फळं आणि भाज्यांची आवक चांगल्या प्रकारे असते. असंही हंगामी फळ खावी. कारण त्यात बरेच गुणधर्म असतात. जे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. त्यातलंच एक उत्तम फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी आपल्या शरीरासाठी हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात चांगली असते. हिवाळ्यात आपल्या शरीरातील अनेक खनिजं आणि जीवनसत्त्वं यांची कमतरता भरून काढायची असेल, तर त्यासाठी आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करणं खूप महत्त्वाचंय. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास खूप चागंले फायदे होतात.

काय आहेत स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे?

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि फायबरचं प्रमाण खूप असतं. यामध्ये पॉलिफेनोल्स नावाच्या अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात. जे डोळ्यामध्ये मोतीबिंदू होण्यापासून प्रतिबंधित करतात.

स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसून कमी कॅलरीयुक्त पदार्थ असतात. यात मॅंगनीज, पेटासियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 9 सर्वकाही असतं. जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. स्ट्रॉबेरी खाल्ल्यानं त्वचा तजेलदार होते. वाढत्या वयानुसार त्वचेवर येणार्‍या सुरकुत्या प्रतिबंधित करण्यात मदत करते.

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात अधिक चमकदार होतात. तसंच हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

स्ट्रॉबेरीमध्ये फायबर असतं. स्ट्रॉबेरी खाल्याने पचन सुधारण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीमध्ये मॅग्नेशियम हे खनिजद्रव्य असतं. त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो, तसंच हाडं दुखण्याचा त्रासही कमी होतो. ज्यांना सांधे दुखीचा त्रास आहे त्यांनी स्ट्रॉबेरीचा समावेश आपल्या आहारात करावा जेणेकरून दुखण्याचा त्रासही कमी होण्यास मदत होईल.

इतकंच नाही तर हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतं. म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी खाणं महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी कुठल्याही प्रकारे खाऊ शकता.

आपल्या स्ट्रॉबेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!