ॲस्टर सीएमआय रुग्णालयात गोव्यातील तरुणीला लिव्हर प्रत्यारोपण करून दिलं जीवदान

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः ॲस्टर सीएमआय रुग्णालयातील डॉक्टरांनी गोव्यातील 21 वर्षीय तरुणी सुजाता चौगुले, हिला लिव्हर प्रत्यारोपण करून जीवदान दिलं. वयाच्या 14 व्या वर्षापासून ती तीव्र यकृताच्या आजाराने त्रस्त होती.
हेही वाचाः पेडणे पोलिसांकडून संशयिताला केरळमधून अटक
3 लाख रुपये खर्चून सुजाताचं यकृत प्रत्यारोपण केलं, तर प्रत्यक्ष खर्च 16 लाख रुपये होता. हे शक्य होऊ शकलं ॲस्टर हॉस्पिटलच्या उपक्रमाद्वारे. ज्या रुग्णांना वैद्यकीय खर्च परवडत नाही, त्यांना हॉस्पिटलच्या प्रयत्नातून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि क्राउडफंडिंगद्वारे आधार दिला जातो.
हेही वाचाः स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी एकसंघ राहून मार्गक्रमण करण्याची गरज
एचपीबीच्या लीड कन्सल्टंट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सोनल अस्थाना यांच्यासह डॉक्टरांची टीम एचपीबी लीड सल्लागार आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. राजीव लोचन, डॉ. एचपीबी सल्लागार कार्तिक रायचूरकर, एकात्मिक लिव्हर केअर सल्लागार डॉ. अरविंद शेषाद्री, यकृत शस्त्रक्रिया सल्लागार डॉ. नेफेन एन, हेपेटोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सल्लागार डॉ. मल्लिकार्जुन सकपाळ, हेपटोलॉजी सल्लागार डॉ अपूर्व पांडे, लीड कन्सल्टंट ऍनेस्थेशिया डॉ. व्ही अरुण आणि सर्व दक्षता घेऊन आईचे यकृत तिच्या मुलीवर यशस्वी प्रत्यारोपित करून तिला नवं जीवन देण्यात आलं.
हेही वाचाः आयबीचे गोवा विभाग प्रमुख अरविंद कुमार नायर यांना राष्ट्रपती पदक जाहीर
सुजाताची आई, भारती चौगुले (वय वर्षं, 47) यांनी त्यांच्या यकृताची उजवी बाजू आपल्या मुलीला दान केली.