राज्यात उष्णतेच प्रमाण वाढतय

दरम्यान मंगळवारी राजधानी दिल्लीतील कमाल तापमान 35.4 डिग्री तर किमान तापमान 25.4 डिग्री एवढं होतं.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनता हैराण झाली आहे. पहाटे थंडी आणि दिवसभर उकाडा यामुळे वृध्द आणि लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.

यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात गेल्या 60 वर्षातील सर्वाधीक पावसाची नोंद झाली आहे. त्यातच कोरोना विषाणुचा प्रसार. त्यामुळे पाऊस आणि कोरोना या दोन्हीमुळे गोमंतकीय जनता मेटाकुटीला आली होती. पाऊस कमी झाल्याने आता हळूहळू कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत आहे. मात्र आता लोकांना उष्णतेचे दाहक चटके सहन करावे लागत आहेत. साधारणतहा राज्यात दिवाळी नंतर थंडी सुरु होते. पण यंदा सकाळच्या सत्रात थंडी पडते नंतर दिवसभर ते मध्यरात्रीपर्यंत उकाडा सुरु होतो. पुढील काही दिवस उकाड्याचे प्रमाण असेच राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.