GLOBAL VARTA | एरिक गार्सेट्टी: एरिक गार्सेट्टी हे भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत असतील, यूएस सिनेटने मान्यता दिली

एरिक गार्सेटी (५२) यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेला अमेरिकन संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटने मंजुरी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांची नियुक्ती केली होती. सिनेटमध्ये गार्सेट्टी यांच्या नामांकनाला ५२-४२ मतांनी मंजुरी देण्यात आली.

ऋषभ | प्रतिनिधी

India Is Situated Between Difficult Neighbours Said The Us Nominated  Ambassador To India | India US: 'अवघड शेजाऱ्यांत' अडकलेल्या भारताला अमेरिका  करणार मदत | Maharashtra Times

लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी हे भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत असतील. अमेरिकन सिनेटने गार्सेट्टी यांच्या नामांकनाला दुजोरा दिला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून त्यांचे नामांकन सिनेटमध्ये 52-42 ने मंजूर झाले. भारतातील अमेरिकेचे राजदूत हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त होते.

गार्सेट्टी यांनी अध्यक्ष जो बिडेन यांचे आभार मानले 


गार्सेट्टी यांनी आनंद व्यक्त केला. प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेली महत्त्वाची जागा भरण्यासाठी आवश्यक असलेल्या आजच्या निकालामुळे आपण खूप खूश असल्याचे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘मी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि व्हाईट हाऊसचा आभारी आहे. मी भारतातील आमच्या महत्त्वाच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारी माझी सेवा सुरू करण्यास तयार आणि उत्सुक आहे. मी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि व्हाईट हाऊसचा आभारी आहे. मी भारतातील आमच्या महत्त्वाच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारी माझी सेवा सुरू करण्यास तयार आणि उत्सुक आहे. मी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि व्हाईट हाऊसचा आभारी आहे. मी भारतातील आमच्या महत्त्वाच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारी माझी सेवा सुरू करण्यास तयार आणि उत्सुक आहे.

यूएस सिनेटने मंजूरी दिली, हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त होते | Eric  Garcetti Becomes Us Ambassador To India; Us Senate Approves | Joe Biden |  Eric Garcetti - Divya Marathi
एरिक गार्सेट्टी यांची अधिकृत प्रतिक्रिया

यापूर्वी भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून केनिथ जस्टर होते, ज्यांनी अमेरिकेत सत्तांतर झाल्याने राजीनामा दिला होता. यानंतर, जुलै 2021 मध्ये, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी एरिक गार्सेट्टी यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्तीची घोषणा केली. तथापि, त्यांचे नामांकन संसदेत मतदानासाठी आणले गेले नाही, कारण सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाला संसदेत पुरेसा पाठिंबा नव्हता.

अमेरिकेच्या सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीने एरिक गार्सेट्टी यांच्या भारतातील राजदूतपदासाठी नामांकन मंजूर केले आणि ते मंजुरीसाठी सिनेटकडे पाठवले . समितीने त्यांच्या नामांकनास १३-८ मतांनी मान्यता दिली. परराष्ट्र व्यवहार समितीवरील सर्व डेमोक्रॅट्स, तसेच रिपब्लिकन सिनेटर्स टॉड यंग आणि बिल हर्टी यांनी एरिक गार्सेट्टी यांना मतदान केले.

एरिक गार्सेटी कोण आहे? 


एरिक एक अमेचर छायाचित्रकार, जाझ पियानोवादक आणि संगीतकार आहेत . ते यूएस नेव्हीच्या रिझर्व्ह इन्फॉर्मेशन डोमिनन्स कॉर्प्समध्ये लेफ्टनंट होते . 2013 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लॉस एंजेलिसच्या महापौरपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली. 2017 मध्ये पुन्हा महापौर झाले. याआधी 2006 ते 2012 या काळात ते लॉस एंजेलिस सिटी कौन्सिलचे अध्यक्षही होते. महापौरपदी निवड होण्यापूर्वी ते आणि त्यांचे कुटुंब इको पार्कमध्ये राहत होते. एरिक हे बिडेनचे जवळचे मानले जातात. 50 वर्षीय एरिक यांचा अध्यक्षीय निवडणुकीत जो बिडेन यांच्या निवडणूक प्रचारात मोठा सहभाग होता. 

US Ambassador to India : एरिक गार्सेटी भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत, यूएस  सिनेटची मंजुरी | पुढारी

एरिकचा वादांशी संबंध  


एरिक गार्सेट्टीचा जवळचा सहकारी रिक जेकब्सवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. तसेच एरिक यांनी महापौरपद भूषवताना याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वेळोवेळी झालेत . या आरोपामुळेच एरिक गार्सेट्टी यांची नियुक्ती होत नव्हती. विरोधी रिपब्लिकन पक्षासोबतच काही डेमोक्रॅट खासदारही एरिक गार्सेट्टी यांच्या दाव्याला विरोध करत होते.

गार्सेट्टी हे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या जवळचे मानले जातात


आहेत. ते बिडेन यांच्या निवडणूक प्रचाराचे सह-अध्यक्ष राहिले आहेत. ते अजूनही राष्ट्रपतींचे सर्वात जवळचे आणि महत्त्वाचे राजकीय सहकारी आहेत. ते बिडेन यांच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, असे मानले जात होते. पण त्याची शक्यता रिक जेकब्सच्या वादानंतर संपुष्टात आली.

यूएस सिनेटने मंजूरी दिली, हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त होते | Eric  Garcetti Becomes Us Ambassador To India; Us Senate Approves | Joe Biden |  Eric Garcetti - Divya Marathi
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!