डिचोलीत ‘शिक्षा व्हिजन’, व्हिजन हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर

डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घेतला पुढाकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : शिक्षा व्हिजन आणि व्हिजन हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे डिचोली इथल्या तारी सभागृहात मोफत मोतिबिंदू आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित केलं. सुमारे 300 लोकांनी या तपासणी शिबीराला प्रतिसाद दिला. अशी शिबीरं संपूर्ण डिचोली तालुक्यात टप्याटप्याने होणार आहेत, असं डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितलं. शिबीरं फक्त डिचोली तालुक्यापुरती मर्यादित असली, तरी याचा फायदा खुप लोकांना होणार आहे. या शिबीरामार्फत सगळयांना मोफत डोळे तपासणी आणि ज्यांना मोतिबिंदू आहे त्यांचं मोफत ऑपरेशन व्हिजन हॉस्पिटलमध्ये होईल, असं डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले. यावेळी डॉ. दयानंद राव हेही उपस्थित होते. त्यांनी डॉ. शेट्ये आणि त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.