शिक्षणातून प्रगती करा! विद्यार्थ्यांना मोफत wifi देताना जीत आरोलकरांचं वक्तव्य

ऑनलाईन शिक्षणाच्या समस्येनं भेडसावलेल्यांना आरोलकरांची मदत

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

मांद्रे : मांद्रे मतदार संघातील कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, जीत आरोलकर यांनी खास उपक्रम राबवलाय. सध्या कोरोना काळात शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु झालं असलं तरी ग्रामीण भागात इंटरनेट सेवा विस्कळीत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेवून मांद्रे उदर्गत आणि मांद्रे मगो पक्षातर्फे मोफत व्हायफाय (WIFI) सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेवून शिक्षणातून प्रगती साधावी, असं आवाहन मांद्रे मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मांद्रे पंचायत सभागृहात केलं. सोमवारी मोफत व्हायफाय इंटरनेट सेवेचा शुभारंभ करतेवेळी ते बोलत होते .

ग्रामीण भागात विद्यार्थ्याना इंटरनेट सेवेची मोठी समस्या आहे. याची गंभीर दखल घेवून मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मांद्रे मतदार संघातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सेवा उपक्रम सुरु केला. आधी मांद्रे पंचायतीने सभाग्रह उपलब्ध करून दिला. या सभागृहात किमान ५० विद्यार्थ्यी सुरक्षित अंतर ठेवून या योजनेचा लाभ घेवू शकतो. ज्यांना या सभागृहात येण्याच्या अडचणी आहेत, त्यांनी या सभाग्रहापासून किमान चार किलोमीटर असलेल्या घरात विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यानी अगोदर मांद्रे कार्यालयात येवून आपली नावनोंदणी करून पासवर्ड घ्यावा लागेल, असे आवाहन यावेळी करण्यात आले जीत आरोलकर यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा नेटवर्कचा प्रश्न सुटणार आहे.

हेही वाचा : मगोपचे जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर चर्चेत

या योजनेचा शुभारंभ करताना पेडणे तालुक्यातून सर्वाधिक शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या नम्रता साळगावकर आणि अक्षदा बर्डे, मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर, माजी सरपंच आम्रोज फर्नांडीस, माजी सरपंच राघोबा गावडे, माजी सरपंच शेरोफिना फर्नांडीस, पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.

जीत आरोलकर काय म्हणाले?

मांद्रे मतदार संघात जनतेला यापूर्वीच डिजिटल सेवा कार्यानिवीत केली आहे. आता नुकताच शालान्त परीक्षेचा निकाल लागलेला आहे. त्यात जे विद्यार्थी दहावी नंतर डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्याना अगोदर CET परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन देण्यासाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करायची आहे. त्यासाठीची मोफत सेवा मांद्रे मगोच्या कार्यालयात उपलब्ध आहे. गरजूंनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.

मांद्रे मतदार संघातील जे विद्यार्थी गरीब आहेत , ज्यांना आर्थिक अडचण आहे, त्या गरजू विद्यार्थ्यांनी कार्यालयात येवून या योजनेचा लाभ घ्यावा. जी काही विद्यार्थ्यांची फी असेल ती जीत आरोलकर भरणार आहे असेही कळवण्यात आलं आहे.

हेही वाचा : जीत आरोलकरांच्या मगोप प्रवेशाचा अन्वयार्थ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!