गोव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारा, संभाजीराजेंची मागणी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
पणजी : गोव्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदानही मोठंय. त्यापार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी केलीय. गोवा विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र उभारावं, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. नवीन विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासकारांना त्याचा लाभ होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 31 ऑक्टोबर रोजी त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि निवेदन दिलं.
लवकरच निर्णय होणार?
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंच यांनीदेखील खासदार संभाजीराजे यांची मागणी रास्त असल्याचं म्हटलंय. या मागणीबाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
रायगड विकास प्राधिकरणाला गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रं, पत्रव्यवहार आणि इतर संदर्भग्रंथांबाबत सहकार्य करावं, अशी विनंतीही करण्यात आलीय. गोव्यात पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष होता. तसंच त्यांचे व्यापारी संबंध देखील होते. त्यामुळे अनेक पत्रव्यवहार झाले. त्यातून रायगड संबंधातील काही नोंदी सापडतील का? हा प्रमुख उद्देश आहे. तसे थेट पुरावे सापडले तर, रायगड संवर्धन कार्यात त्याचा उपयोग होईल, असे खासदार संभाजीराजेंनी म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांची भूमिका
राज्यात पोर्तुगीज, मराठी किंवा इंग्रजी जाणणारे लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाला सर्व ती कागदपत्रे उपलब्ध करून देता येऊ शकतात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. खासदार संभाजी राजेंच्या अनुभवाचा लाभ गोवा सरकारला होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना किल्ले संवर्धनाचे काम एकत्र येऊन काम करण्यासह संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी दिलं.
हेही वाचा –
किल्ले हळर्ण… व्वा! खूपच सुंदर
EXCLUSIVE | दातांनी नारळ सोलणारी मल्टिटॅलेंटेड शब्दुले
मुंबईत जायचा विचार करत असाल तर ही आकडेवारी तुमच्यासाठीच!