तारीख ठरली! दिवाळीनंतर ‘या’ दिवशी शाळा सुरु होणार

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी : शाळा कधी सुरु होणार? याचं उत्तर मिळालंय. मुख्यमंत्र्यांनी या बाबत माहिती दिली आहे. दिवाळीनंतर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु होणार आहे. 21 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, एसओपी या सगळ्याचं पालन करुन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
पालक विद्यार्थ्यांना पाठवतील?
खरंतर शाळा सुरु होणार असल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात येत असल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय.
महत्त्वाचं म्हणजे मृत्यूदर काही कमी होत असल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. शिक्षक आणि पालकांचं एक सर्वेक्षणही करण्यात आलं होतं. त्यात शाळा सुरु करु नयेत, असाच सूर उमटला होता. अशात शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानं पालक आणि शिक्षकांकडून काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्त्वाचंय.
हेही वाचा – अभ्यासक्रमानंतर आता दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीतही कपात
फक्त दहावी, बारावीच
शाळा फक्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु होणार आहेत. इतर इयत्तांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता नेमकं या इयत्ता कधी सुरु होणार, असाही प्रश्न कायम आहे. मात्र या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही गोवनवार्ता लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या वाचकांना करत आहोत.
पाहा सविस्तर बातमी
हेही वाचा -पालकांचा शाळा सुरु करण्यास ‘रेड सिग्नल’