नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

नीट पीजी 2021 परीक्षा 11 सप्टेंबर 2021 ला

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून नॅशनल एलिजीबीलिटी एंट्रास टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षेचे एडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. नीट पीजी 2021 परीक्षेचं एडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईट nbe.edu.in वरुन डाऊनलोड करता येईल. विद्यार्थ्यांना एडमिट कार्ड डाऊनलोड करायचे असल्यास नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. नीट पीजी 2021 परीक्षा 11 सप्टेंबर 2021 ला आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दुपारी 1 ते सांयकाळी 5:30 वाजेदरम्यान आयोजित केली जाईल . ही परीक्षा कॉम्प्यटर बेस्ड पद्धतीनं होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

हेही वाचाः निवडणूक येता दारी, पिशव्या येती घरी!

ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी आयोजित केली जाणार आहे. नीट पीजी 2021 परीक्षा केंद्रांविषयी माहिती एडमिट कार्डवर दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी एडमिट कार्ड डाऊनलोड करुन परीक्षा केंद्रांवर कसे पोहोचायचे या विषयी माहिती मिळवावी.

नीट पीजी 2021 एडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे?

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी एनबीईची ऑफिशियल वेबसाईट nbe.ed.u.in वर भेट द्यावी.
स्टेप 2: वेबसाईट वर दिलेल्या “NEET PG 2021 Admit Card” लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3: युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
स्टेप 4: तुम्हाला तुमचे एडमिट कार्ड उपलब्ध होईल.
स्टेप 5: एडमिट कार्ड डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून ठेवा.

नीट पीजी परीक्षा का घेतली जाते?

NEET PG 2021 परीक्षा मेडिकलमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मात्र,त्या विद्यार्थ्यांनी इटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. MBBS हा पदवी आणि MD पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

हेही वाचाः राज्यात पुढील वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू

नीट यूजी परीक्षा 12 सप्टेंबरला

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली झाणार आहे. नीट परीक्षेसाठी 6 दिवस बाकी राहिले आहेत. नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचं प्रवेशपत्र 9 सप्टेंबर रोजी मिळणार आहे. विद्यार्थी परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र एनटीएच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र जाहीर होण्यासंदर्भातील तारीख जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

नीट यूजी परीक्षेचं प्रवेशपत्रासोबत विद्यार्थ्यांना एक स्वयंघोषणापत्र उपलब्ध होार आहे. त्या स्वयंघोषणापत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी अलीकडील काळात केलेल्या प्रवासाची माहिती भरावी लागणार आहे. कोरोनाचा प्रास रोखण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून हा अर्ज भरण्यास सांगण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ पहाः COVID | VACCINATION | दोन्ही डोस घेऊनच सणांसाठी एकत्र या!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!