1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात

या निर्णयाने विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा ताण कमी होणार आहे.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: गोवा सरकारच्या शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली आहे. कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर 2020-21 शैक्षणीक वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच मंडळाने स्पष्ट केलंय.

जो आभ्यासक्रम वगळण्यात आला आहे त्याचा तपशील मंडळाने जाहीर केलाय. त्यासंबंधीचे निर्देश आणि माहिती राज्यातली सर्व शाळांना देण्यात आलीय. प्राथमीक आणि माध्यमीक भाषा विषयांत व्याकरण आणि भाषा कौशल्य या अभ्यासक्रमात कोणतीही कपात केलेली नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!