EDUCATION | इस्त्रोकडून ५ दिवसांचा ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स

११ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणार कोर्स; अधिकृत वेबसाइटवर जाऊन करा नोंदणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं (इस्त्रो) तर्फे पाच दिवसांचा ऑनलाइन कोर्स आणण्यात आलाय. यासाठी प्रोफेशन्सल आणि रिसर्च क्षेत्राशी संबंधित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हा संपूर्ण कोर्स पाच दिवसात पूर्ण होणार असून ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या कोर्सससाठी कुठे घराबाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथून ऑनलाइन माध्यमातून कोर्सशी कनेक्ट होऊ शकता.

भू-स्थानिक इनपुट विषयावर कोर्स

अमृत उपयोजनेंतर्गत मास्टर प्लॅन फॉर्म्युलेशन सक्षम करण्यासाठी भू-स्थानिक इनपुट या विषयावर हा कोर्स असणार आहे. इस्त्रोच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती तसेच ऑनलाइन अर्जाची लिंक देण्यात आली आहे. सर्व उमेदवारांसाठी हा कोर्स निशुल्क असणार आहे. कोर्समध्ये ७० टक्के उपस्थितीत अनिवार्य आहे. त्यामुळे यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये कोर्स

जिओस्पेशियल मॉडेलिंग आणि शहरी आणि प्रादेशिक क्षेत्रांसाठी अनुप्रयोगांवर आधारित हा विषय असेल. हा कोर्स ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. या कोर्समध्ये पाच दिवस पास विषय शिकविले जाणार आहेत. प्रत्येक विषय हा दीड तास शिकविला जाणार आहे. हा कोर्स शहरी आणि प्रादेशिक नियोजन, शहरी आणि प्रादेशिक नियोजन, भूगोल, पर्यावरण अभ्यास, स्थापत्य इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर या क्षेत्राशी संबंधित उमेदवारांसाठी बनविण्यात आला आहे.

प्रोग्रामचा संपूर्ण तपशील, अंमलबजावणी आणि वितरण, रिमोट सेन्सिंग डेटा सेटची माहिती यामध्ये शिकविली जाणार आहे. शहरी वैशिष्ट्यांची ओळख आणि व्याख्या, ज्योग्राफिकल इन्फोर्मेशन सिस्टिम आणि मॉडेलिंग, मॅप प्रोजेक्शनचा अभ्यासक्रमाचा देखील यामध्ये समावेश आहे.

इ२ एमबीपीएस किंवा ३जी पेक्षा जास्त इंटरनेट स्पीड असणे गरजेचे

या कोर्समध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे स्वत:चाडेस्कटॉप/ कम्प्युटर किंवा लॅपटॉप असणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांच्या कोर्समध्ये कोणताही अडथळा येणार आहे. या कॉम्प्युटरवर Windows, Macintosh, Linux, Android किंवा IoS ही ऑपरेटींग सिस्टिम असणे गरेजेचे आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज किंवा सफारी या वेब ब्राऊजरमधून उमेदवार लॉगिन करु शकतात. यासाठी २ एमबीपीएस किंवा ३जी पेक्षा जास्त इंटरनेट स्पीड असणे गरजेचे आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!