अभ्यासक्रमानंतर आता दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीतही कपात

सुट्टीत कपात केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.

सुट्टीमध्ये लक्षणीय कपात

शिक्षण खात्याने या शैक्षणिक वर्षातील दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्टीत लक्षणीय कपात केली आहे. शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी यासंदर्भातील परिपत्रकही जारी केलंय. यानुसार यंदा दिवाळीची सुट्टी 9 ते 20 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. तर नाताळची सुट्टी 24 ते 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. दिवाळीची सुटी आठ तर नाताळची सुट्टी दोन दिवसांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात साहजिकच नाराजी आहे. मात्र सिलॅबस पूर्ण करण्याचं आव्हान सध्या शिक्षकांसमोर आहे. त्यामुळे ही सुट्टी कमी केली असल्याचं बोललं जातंय.

सिलॅबस पूर्ण करण्याचं आव्हान

दरम्यान, या आधीच पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. तरीही 70 टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी फार कमी दिवस शिक्षकांच्या हातात आहेत. त्यामुळे सुट्टीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही याआधी सुट्टी कमी करण्याबाबात संकेत दिले होते.

शाळा कधी सुरु होणार?

दरम्यान, या आठवड्यात शाळा कधी सुरु होणार, याचा निर्णय येणं अपेक्षित होतं. मात्र सर्वेक्षणात शाळा सुरु होण्यास विरोध असल्याचा सूर उमटल्यानं हा निर्णय या आठवड्यात होऊ शकलेला नाही. त्यामुळे नेमक्या राज्यातील शाळा कधी उघडणार, हा प्रश्न कायम आहे.

हेही वाचा –

म्हापसा अर्बन बँकेसंदर्भातली महत्त्वाची बातमी

‘नो शर्ट फ्री बिअर’ ऑफर महिलांना देणारा बार भाजप कार्यकर्त्यांनी शोधला!

अजबच! ती चक्क दातांनी सोलते नारळ…

भारतात पबजीचा खेळ खल्लास

तातडीनं आटपून घ्या बँकेची कामं! नोव्हेंबरचा अर्धा महिना बँका बंद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!