बारावीनंतर पुढं काय? हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राविषयी जाणून घ्या, वाचा सविस्तर

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारंपारिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याऐवजी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतल्यास करिअरला वेगळं वळण मिळण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: भारतात गेल्या काही वर्षांपासून पर्यटन आणि हॉस्पिटलिटीसह हॉटेल इंडस्ट्री वाढत आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारंपारिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याऐवजी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतल्यास त्यांच्या करिअरला वेगळं वळण निर्णय देणारा निर्णय ठरु शकतो. हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटलटी क्षेत्र सातत्यानं वाढत असल्यानं या क्षेत्रात करिअरच्या चागंल्या पगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

हेही वाचाः अमली पदार्थ प्रकरणी दोघांना सशर्त जामीन मंजूर

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र नेमकं काय?

हॉस्पिटलिटी आणि हॉटेल इंडस्ट्रीचा विस्तारानं अभ्यास हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात केला जातो. यामध्ये हॉटेल, मॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट मॅनेजमेंट कोर्स, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचं शिक्षण देशभरातील विविध संस्थातून दिलं जातं.

हेही वाचाः संशयित सोलोमनचे उच्च न्यायालयात आव्हान

बारावी उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रांना प्रवेश घेऊ शकतात?

हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्राला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सहा महिन्यांचा असून, डिप्लोमा हा एका वर्षाचा किंवा दोन वर्षांचा असेल. तर पदवी अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा आहे. शासकीय हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या एनसीएचम जेईई ही परीक्षा द्यावी लागेल.

बारावीनंतरचे अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट, बीए इन हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए इन हॉस्पिटलिटी , ट्रॅव्हल अँड टुरिझम, बीबीए इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

हेही वाचाः कवळे अपघातातील दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

दहावीनंतरचे अभ्यासक्रम

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन, डिप्लोमा इन फुड अँड बेवरेज सर्व्हिसेस, डिप्लोमा इन फुड अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम

हेही वाचाः गिरी येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता

पदवीनंतरचे अभ्यासक्रम

मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर इन टुरिझम अँड हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए इन हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए इन हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, एमएससी टुरिझम अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, एमबीए हॉस्पिटलिटी

हेही वाचाः कोलवाळ कारागृहाचा जेल गार्ड निलंबीत

कोणत्या पदांवर नोकरी मिळते?

हॉटेल मॅनेजमेंटमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजर, रेस्टॉरंट मॅनेजर, इंव्हेंट मॅनेजर,एक्झ्युकेटिव्ह शेफ,इव्हेंट को-ऑर्डिनेटर, हाऊसकिपींग मॅनेजर, हॉटेल डायरेक्टर, रिसॉर्ट मॅनेजर आदी पदावंर नोकरी मिळते.

हा व्हिडिओ पहाः MONEY | POLITICS | इलेक्टोरोल बाँडमधून हजारो कोटींच्या देणग्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!