डिचोलीत शिक्षा व्हिजन संस्थेचे उद्घाटन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

समाजाच्या उत्कर्षासाठी शिक्षण हीच काळाची गरज

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : शिक्षण हे समाजाच्या उत्कर्षासाठी आहे. समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी शिक्षण गरजेचं आहे, असं मत शिक्षणतज्ज्ञ सुभाष नायक यांनी व्यक्त केलंय. डिचोलीत शिक्षा व्हिजन संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्वी शिक्षणाचा जीवनाशी काहीच संबंध नाही अशी स्तिती होती. आज ती बदलत असून देशाचे, समाजाचे ऋण फेडणे गरजेचे आहे. कोविडं संकटाचा सामना जग करीत आहे तरीही शिक्षण आणि आरोग्य या दोन जीवनातील महत्वाच्या गोष्टी आहेत. शिक्षणाचा जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. मनाला, बुद्धीला योग्य दिशा देण्याचे काम अंतर्यामी तळमळ असलेले शिक्षक करू शकतात, असं प्रतिपादन जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य सुभाष नायक यांनी केले. शिक्षा व्हिजन या नवीन संस्थेच्या उदघाटन तसेच गुणवंत विदयार्थी गौरव कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते.

झांटये सभागृहात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकरी दीपक वायंगणकर प्रमुख वक्ते प्राचार्य सुभाष नायक, डॉ चंद्रकांत शेटये, डॉ दिनेश आमोणकर उपस्थित होते.

गोव्याच्या शिक्षणाचा दर्जा खूपच खालावलेला आहे. केंद्रीय सर्वेक्षणात गोव्याला 283 गुण मिळाले. विज्ञान आणि गणित या विषयात गोव्याची मुलं खूप मागे आहेत. याची कारणं शोधणं गरजेचंय. शिक्षणाचा पाया खराब असल्याने ही परिस्थिती असून मूळ शिक्षण व संकल्पना चुकीच्या पायावर आधारित असून मातृभाषेतून शिक्षण गरजेचं आहे.

-डॉ. दिनेश आमोणकर

डिग्री आणि प्रशातीपत्रके घेऊन काम होणार नाही. माणूस घडवणारे शिक्षण आणि गुणवत्ता गरजेची आहे. असे झाले तरच देश व राज्याला चांगले दिवस येतील.

– शिक्षणतज्ज्ञ सुभाष नायक

प्रमुख पाहुणे दीपक वायंगणकर यांनी शिक्षा व्हिजन संस्थेच्या माध्यमातून मानव सेवा कारण्याचा द्यास घेतलेला असून अनेक सेवा कार्यात त्यांनी मोठं योगदान दिलंय. समाजाशी सकारात्मक नाते ठेवून सेवा कार्य करण्याचा ध्यास संस्थेने घेतलेला आहे पालक शिक्षक व विद्यार्थी तिन्ही घटक समन्वय साधतील तर विद्यार्थ्यांचे जीवन यशस्वी होईल. अनेक संकटाचा सामना करीत विद्यार्थ्यांना पुढे जायचे आहे ध्येय निश्चित करून त्याचा पाठलाग करा तसेच यशस्वी होताच जमिनीवरच राहा व मातृभूमीची देशाची व समाजाची सेवाही करा. दूरदृष्टी ठेवून आज संस्थेने समाजाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न बाळगून पुढाकार घेतला आहे या संस्थेचा उत्कर्ष होत राहो, असं आवाहन केलंय.

स्वागतपर भाषणात डॉ चंद्रकांत शेटये यांनी शिक्षा व्हिजन या बहुउद्देशीय संस्थेची स्थापना सामाजिक सेवा कार्य करण्यासाठी आहे. शिक्षण ,आरोग्य ,कला, क्रीडा, सांस्कृतिक महिला कल्याण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत. सर्वाना बरोबर घेऊन ही संस्था विविध क्षेत्रात योगदान देणार आहे असे डॉ शेटये यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!