Big Breaking : भारताची पहिली स्वदेशी लस COVAXINला मंजुरी

आपत्कालीन वापरासाठी परवानगी

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : मेड इन इंडिया कोरोना लस COVAXINच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे जिच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

हैदराबादच्या भारत बायोटेकनं ही लस तयार केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CDSCOच्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. आता DCGI याबाबत अंतिम निर्णय घेईल. या निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

COVAXIN म्हणजेच BBV152 लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीनं जारी केला होता. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!