दमाग्रस्तांना कोरोना संसर्गाची जोखीम

कोरोना फुफ्फुसांवर आक्रमण करत असल्यानं जास्त धोका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सध्या सगळीकडे कोरोना महामारीची चर्चा आहे. याभरात इतर आजार बाजूला जाऊन पडलेले आहेत. मात्र, कोरोना हा फुफ्फुसं व श्वसन प्रक्रियेवर आक्रमण करत असल्यामुळे अस्थमा म्हणजेच दम्याचा विकार असलेल्या रुग्णांनी जास्तच काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचाः आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील त्रुटी मान्य करा

दम्याच्या विकासाविषयी अनेक गैरसमजुती

दम्याच्या विकाराविषयी आजही अनेक गैरसमजुती असल्याचं दिसून येतं. ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा’ यांच्यानुसार ज्या सर्वसामान्य गैरसमजुती दिसून येतात त्यामध्ये अस्थमा हा केवळ मुलांना होतो आणि तो वाढत्या वयाबरोबर ठीक होतो, अस्थमा हा संसर्गजन्य विकार आहे तसंच त्याच्या रुग्णांनी व्यायाम करू नये वा अस्थमा केवळ स्टेरॉइड्सचे मोठे डोस देऊन ठीक केला जाऊ शकतो या गैरसमजुतींचा समावेश होतो.

हेही वाचाः वाढत्या कोविड रुग्णांचा आरोग्य यंत्रणेवर ताण

योगासने आणि मुद्रा अभ्यास फायदेशीर

या विकाराविषयीच्या एका अहवालाप्रमाणे, दरदिवशी या विकारामुळे एक हजार लोकांचा मृत्यू होतो आणि जगभरात सुमारे 34 कोटी लोक त्याने ग्रस्त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दम्याचा विकार असलेल्यांनी आपल्या खाण्या पिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यांनी आर्टिफिशियल स्वीटनर, रासायनिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, व्हेजिटेबल ऑईल टाळायला हवं. तसंच शक्य तितकं तळलेल्या पदार्थांपासून दूर राहायला हवं. अस्थमा नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि मुद्रा अभ्यास फायदेशीर ठरू शकतो.

हेही वाचाः खंवटेंकडून पर्वरी आरोग्य केंद्राला ‘कोव्हिड असिस्ट’

कोरोना संसर्ग झाल्यास धोका

दम्याच्या विकारात आपल्या फुफ्फुसांशी जोडलेल्या श्वासनलिका या आपोआप बारीक होत असतात. त्यामुळे श्वास घेतला तरी तो नीट आत जाऊ शकत नाही आणि आपली दमछाक होऊ लागते. दम्याचा विकार आधीच फुफ्फुसं खराब करून टाकत असतो आणि कोरोनाही फुफ्फुसांनाच बाधा पोहोचवत असतो. त्यामुळे दम्याचा विकार असलेल्यांना कोरोनापासून जास्त धोका संभवतो आणि त्यांनी या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जास्त काळजी घ्यायला हवी. दम्याचा विकार असलेल्यांनी कोरोनापासून स्वतःला अधिक जपायला हवं. त्यांनी नियमित औषधं घ्यायला हवीत व इतरांकडे जाणं टाळावं तसंच बाहेर जाणंही शक्य असेल तितकं टाळावं. धूळ असलेल्या जागी वा इतर त्रास होऊ शकणाऱ्या ठिकाणी गेल्यास दम्याचा विकार बळावू शकतो. अशा स्थितीत कोरोना झाल्यास आणखी जास्त त्रास होऊ शकतो. अर्थात कोरोनाचा संसर्ग झालेला दम्याचा रुग्ण उपचारांनी ठीक होऊ शकतो. पण कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झालेला आहे, तो तीव्र झालेला आहे की कमी यावर अवलंबून असतं, असं त्यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!