गुरु-शिष्य परंपरा हा भारताचा सांस्कृतिक आत्मा : नीता अंबानी

‘परंपरा : गुरुपौर्णिमा विशेष’च्या माध्यमातून गुरु-शिष्यांचा सन्मान

Goan Varta Live | प्रतिनिधी

न्यूजडेस्क : ‘गुरु-शिष्य परंपरा हे भारताच्या कलात्मक आणि सांस्कृतिक वारशाचे हृदय आणि आत्मा आहे. आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचा तो पाया आहे. तो आपला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा पूल म्हणून काम करतो. आपल्या मूल्यांना मूर्तरूप देणारी ही एक उज्ज्वल परंपरा आहे’, असे प्रतिपादन नीता अंबानी (Nita Ambani) यांनी केले.

गुरु-शिष्य परंपरा हा भारताचा सांस्कृतिक आत्मा : नीता अंबानी

त्या ‘परंपरा : गुरुपौर्णिमा विशेष’च्या माध्यमातून गुरु-शिष्यांचा सन्मान करताना बोलत होत्या. #NitaMukeshAmbaniCulturalCentre येथे भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वोत्कृष्ट उस्ताद आणि त्यांच्या नामवंत शिष्यांना एकत्र आणत दोन दिवसीय विकेंड स्पेशल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरू-शिष्य नात्याला वार्षिक मानवंदना म्हणून नीता अंबानी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सादरीकरण करण्यात आले. यानिमित्ताने भारतातील सर्वोत्कृष्ट गुरू-शिष्य परंपरेचे दर्शन जगाला झाले. सदर कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील नामवंत गुरू-शिष्यांनी सादरीकरण केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!