केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना, हेलिकॉप्टर रोटर ब्लेडच्या रेंजमध्ये आल्यानंतर एकाचा मृत्यू

केदारनाथमध्ये रविवारी दुपारी हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडकून एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. हे अधिकारी हेलिकॉप्टर चालवणाऱ्या कंपनीचे होते.

ऋषभ | प्रतिनिधी

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी दुपारी हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडकून एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हे अधिकारी हेलिकॉप्टर चालवणाऱ्या कंपनीचे होते. या अपघातावरून अधिकाऱ्याचे मुंडके कापले गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी एसपी रुद्रप्रयाग विशाखा अशोक यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले, ‘केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर रोटर ब्लेडच्या रेंजमध्ये आल्यानंतर एकाचा मृत्यू झाला. मृत हे केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर चालवणाऱ्या कंपनीचे अधिकारी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित सैनी असे मृताचे नाव असून तो उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचा आर्थिक नियंत्रक होता. घटनास्थळाची पाहणी सुरू असताना हा अपघात झाला. यावेळी उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे सीईओही तिथे होते. विशेष म्हणजे 25 एप्रिलपासून केदारनाथ यात्रा सुरू होणार आहे. याबाबतची तयारी जोरात सुरू आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!