आकाश बायजूसचे दाबोळी येथे नवे क्लासरूम सेंटर; गोवा राज्यातील तिसरे केंद्र

दाबोळी येथे मोक्याच्या जागी म्हणजेच दाबोळी जंक्शनजवळच प्रभू सिग्नेचर इमारतीमध्ये रिलायन्स ट्रेंड्सच्या वर दुसऱ्या मजल्यावर तब्बल ५२०० चौरस फूट जागे हे केंद्र उभारण्यात आले आहे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट, 12 मे : भारतातील प्रवेशपरिक्षांची तयारीबाबत मार्गदर्शन, प्रशिक्षण सेवा देण्यात अग्रणी ब्रँड असलेल्या आकाश बायजूसने दाबोळी येथे आपले नवे क्लासरूम सेंटर सुरू केले आहे. राज्यातून नीट, आयआयटी जेईई, ऑलिम्पियाड परिक्षांची तयारी तसेच फाउंडेशन अभ्यासक्रम यासाठी राज्यातून वाढत्या मागणीचा अभ्यास करून आकाश बायजूसने हे नवे केंद्र सुरू केले आहे. आकाश बायजूसचे केंद्रजाळे देशभर विस्तारत असून २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून विस्तारलेल्या ३३०हून अधिक केंद्रांच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ निवासी भागाजवळच दर्जेदार व प्रभावी मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून देण्याचा ध्यास प्रतिबिंबित करते.

दाबोळी येथे मोक्याच्या जागी म्हणजेच दाबोळी जंक्शनजवळच प्रभू सिग्नेचर इमारतीमध्ये रिलायन्स ट्रेंड्सच्या वर दुसऱ्या मजल्यावर तब्बल ५२०० चौरस फूट जागे हे केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी विकसित ७ वर्गखोल्यांमधून एकाचवेळी ५५०हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे. कनेक्टेड तसेच स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून या केंद्रात विद्यार्थ्यांना विविध हायब्रिड कोर्सचा लाभ घेता येईल. आकाश बायजूसचे गोवा राज्यातील हे तिसरे केंद्र आहे. पहिली दोन केंद्रे पणजी व मडगाव येथे कार्यरत आहेत.

दाबोळी येथिल नव्या क्लासरूम सेंटरची वैशिष्ट्ये

  • मोक्याच्या ठिकाणी ५२०० चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या केंद्रात ७ वर्गखोल्या; नीट, जेईई आणि ऑलिम्पियाड परिक्षांच्या तयारीसाठी ५५० वद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची केंद्राची क्षमता
  • कनेक्टेड आणि स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून या नव्या केंद्रात लाइव्ह ऑनलाइन मार्गदर्शन, वेबिनार या विविध मार्गाने ब्लेंडेड हायब्रिड अभ्यासक्रम प्रशिक्षणाची सुविधा
IAS Coaching in Delhi | Best Coaching For UPSC 2023 | BYJU'S

आकाश बायजूसचे विभागीय संचालक श्री. अमित सिंह राठोड यांच्या हस्ते कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाबोळी येथील या नव्या केंद्राचे उद्घाटन नुकतेच पार पडले. प्रवेश घेण्यासाठी आपल्या गुणपत्रकाच्या आधारे नावनोंदणी करून विद्यार्थी इन्स्टंट एडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट (आयएससीएसटी), एसीएसटी देऊ शकतात किंवा आकाश बायजूसच्या प्रमुख व वार्षिक शिष्यवृत्ती परिक्षा असलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा (एएनटीएचई- अँथ)साठी नोंदणी करू शकतात.

Byju's to pump in $200 mn in 2 yrs to expand hybrid tuition model -  BusinessToday

गोव्यात नवीन केंद्र सुरू केल्याबद्दल आकाश बायजूनसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिषेक माहेश्वरी म्हणाले, “आकाश बायजूसमध्ये आम्ही विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला चालना देण्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे विद्यार्थी जेथे असतील तेथे अभ्यासक्रम पोहोचवणे आणि त्यांना शिक्षण-प्रशिक्षण उपलब्ध करणे. आमचा कामातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अभ्याससाहित्याची गुणवत्ता याबरोबर ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणपद्धतीत योग्य समतोल राखत मार्गदर्शनाची उपलब्धता हे आहे. थोडक्यात, आमच्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा अनुभव आणि परिणामांना चालना देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाची स्वप्ने साकार करण्यात मदत करण्यासाठी आम्ही वास्तविक आणि आभासी अशा दोन्ही जगातील सर्वोत्तमता देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

आकाश बायजूसचे प्रादेशिक संचालक श्री. अमित सिंह राठोड म्हणाले, “दाबोळी येथे आमचे नवे केंद्र सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. कारण या भागामध्ये शेकडो विद्यार्थी नीट, जेईई आणि ऑलिम्पियाड अशा परिक्षांच्या तयारी करत असून आमच्या मार्गदर्शनाचे मोल त्यांना कळाले आहे. आमच्या सर्व केंद्रांमध्ये शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा दर्जा उच्च राखण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक, मार्गदर्शक आणि समुपदेशक आहेत. आमचे केंद्र मोठ्या शहरापासून कितीही लांब किंवा जवळ असले तरी शिक्षण-प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा उच्च दर्जा आम्ही सुनिश्चित करत आहोत. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शहरात, भागात असे थेट मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यामुळे त्यांना जागतिक दर्जाचे मार्गदर्शन त्यांच्या घराजवळच उपलब्ध झाले असून अशा प्रकारच्या मार्गदर्शनासाठी त्यांना आपले घर, पालक, कुटुंब सोडून दूरच्या शहरात किंवा राज्यात जावे लागणार नाही.”

BYJU'S to acquire Aakash Educational Services Limited (AESL)

आकाश बायजूसद्वारे नीट, आयआयटी जेईई, ऑलिम्पियाड आणि फाऊंडेशन प्रोग्रामच्या माध्यमातून दरवर्षी ३.३० लाख विद्यार्थ्यांना थेट आणि ऑनलाइन क्लासरूम सुविधेच्या माध्यमातून निकाल-आधारित मार्गदर्शन सेवा दिले जाते. छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचे दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध व्हावे यासाठी क्लाउड-आधारित ऑनलाइन कोचिंग सेवा तसेच प्रत्यक्ष सेंटरच्या माध्यमातून आकाश बायजूस आपले मार्गदर्शन जाळे विस्तारत आहे.

आकाश बायजूस विषयी

आकाश बायजूस (AESL)द्वारे वैद्यकीय (नीट) आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा (जेईई), शालान्त मंडळ परीक्षा आणि तसेच एनटीएसई, केव्हीपीवाय ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वकष परिक्षा तयारी मार्गदर्शन सेवा प्रदान केली जाते. “आकाश” हा ब्रँड विविध वैद्यकीय (NEET) आणि JEE/इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि ऑलिम्पियाड साठी दर्जेदार मार्गदर्शन करणे आणि अनुभवसिद्ध हमखास यशस्वी कामगिरीसाठी ओळखला जातो.

परिक्षा तयारी मार्गदर्शन क्षेत्रामध्ये ३४हून अधिक वर्षांच्या अनुभवासह कंपनीकडे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आणि अनेक फाउंडेशन स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा/ ऑलिंपियाडमध्ये ३२५+ आकाश बायजूस केंद्राचे देशव्यापी जाळे (फ्रॅंचायझीसह) कार्यरत असून वार्षिक ३,३०,०००हून अधिक विद्यार्थी या मार्गदर्शन सेवेचा लाभ घेत आहेत.

आकाश ग्रुपमध्ये थिंक अँड लर्न प्रा.लि. (बायजूस)ने तसेच जगातील सर्वांत मोठी खासगी गुंतवणूक संस्था असलेल्या ब्लॅकस्टोनने आर्थिक गुंतवणूक केलेली आहे.

Start-ups Acquisition: Byju's Buyout of Aakash, a Strategic Future Plan
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!