झुआरी पुलावरील वाहतूक ‘या’ दिवशी बंद

पुलाची होणार नियमित तपासणी. कुठ्ठाळी ते आगशी आणि आगशी ते कुठ्ठाळी या मार्गावर फेरीबोटची व्यवस्था.

शेखर नाईक | प्रतिनिधी

पणजी : पणजी-मडगाव मार्गावरील झुआरी पुलाची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी रविवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

या तीन तासांत या मार्गावरील वाहतूक बोरी पूलमार्गे वळवली जाईल. तसेच या काळात कुठ्ठाळी ते आगशी आणि आगशी ते कुठ्ठाळी या मार्गावर फेरीबोटची व्यवस्था करण्यात आली आहे. हलकी वाहनांसह प्रवासी फेरीबोटीतून प्रवास करू शकतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.