Video | पार्से खाजनगुंडो बांध या पर्यटनस्थळाजवळ भली मोठी मगर पकडली

भररस्त्यातच मगर पकडण्याचा थरार

Goan Varta Live | प्रतिनिधी

मांद्रे : अनेकदा गोव्यातल्या रस्त्यांवर मगर आढळून आलेली आहे. त्यामुळे गोव्यात मगरींची दहशत काही नवी नाही. पण मंगळवारी पार्से खाजनगुंडो बांध या ठिकाणी मगर आढळून आली. ही मगर आढळून आल्यामुळे स्थानिक युवकांनी तत्काळ पुढाकार घेत या मगरीला पकडलं. भररस्त्यामध्ये मगर पकडण्याचा थरार यावेळी पाहायला मिळाला.

वैभव भिवशेट, विघ्नेश फोंडेकर, महादेव म्हापसेकर, कैलाश पेटकर, काशिनाथ शेटगावकर आणि महेंद्र म्हालदार या युवकांनी मिळून या मगरीला पकडलं. यावेळी दोघांनी मगरीची शेपटी पकडली. तर दोघांनी मगरीचा जबडा हातानं घट्ट दाबून ठेवला होता. तर एकानं मगरीच्या पाठीवर बसून तिच्या तोंडाला बांधल. भर रस्त्यामध्येच हा सगळा थराराक प्रकार सुरु होता. त्यानंतर या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. खाजन गुंडो पार्से याठिकाणी मगर आढळून आल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचंही वातावरणं होतं.

हेही वाचा – Video | CROCODILE | RESCUE | डिचोलीत आणखी मगरी असण्याची शक्यता!

पाहा कशी पकडली मगर…

हेही वाचा – ‘आम्ही गुंड किंवा जमीन बळकावणारे नाहीत, आम्ही नीज गोंयकार आणि खरे भूमिपुत्र आहोत’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!