विघ्नहर्त्याचं दोन हजार घरांत आज पूजन

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : आज अश्विन शुद्ध चतुर्थी. आजच्या दिवशी राज्यातील दोन हजार कुटुंब गणेश चतुर्थी साजरी करणार आहे. कोरोनामुळे विविध कारणास्तव अडलेला गणेश चतुर्थी उत्सव नवरात्री किंवा माघ महिन्यातील चतुर्थीला केला जातो. त्यानुसार आज ही पूजा दोन हजार घरात पार पडणार आहे.
म्हणून आज बाप्पाचं पूजन
हिंदू कुटुंबात एखादी व्यक्ती दगावल्यास सुतक पाळलं जातं. हे सुतक बारा दिवसांचं असतं. सुतक काळात कोणत्याही प्रकारची धार्मिक देवकार्य किंवा शुभकार्य केली जात नाही. फक्त घरातलेच नव्हे तर सर्व नातेवाईकांनाही सुतक पाळणं भाग असतं. गणेश चतुर्थीच्या काळाता सातशेहून अधिक लोक आयसोलेशनमध्ये होते. त्यावेळी होम आयसोलेशन करण्यात आलं नव्हतं.
अशा अनेक घरांमध्ये त्यामुळे चतुर्थी साजरी करता आली नव्हती. आज सकाळी प्राणप्रतिष्ठापना आणि संध्याकाळी विसर्जन असा एक दिवसाचा पूजाविधी आज केला जाणार. आजच्या पुजेत कोरोनाचं विघ्न दूर करण्याची प्रार्थना विघ्नहर्त्याकडे गणेशभक्त करत आहेत.
बाप्पाला साकडं
चतुर्थीपर्यंत राज्यात 80 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आता तर हा आकडा पाचशेच्या पार गेला आहे. सध्या राज्यातील रुग्णवाढीचा वेग मंदावला असला, तरी मृत्यूदराची चिंता सगळ्यांनाच सतावते आहे. दरम्यान, लवकरात लवकर कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी अनेक गणेशभक्त आज बाप्पाला साकडं घालत आहेत.
हेही वाचा –
खासगी जमिनीतील वाट अडवली; गुळेलीत संताप
होंडा शिक्षकांचा तब्बल 5 महिन्यांचा पगार रखडला
भाज्यांची भाववाढ, सामान्यांच्या खिशाला कात्री, वाचा कोणती भाजी कितीला?