गोव्यात पोस्टिंग झालेल्या लेडी सिंघम अस्लम खान यांचा थक्क करणारा जीवनप्रवास

अस्लम खान गोव्याच्या डीआयजीपदी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

आयपीएस अस्लम खान यांची गोव्याच्या पोलिस उपमहानिरीक्षक अर्थात डीआयजी म्हणून नियुक्ती झालीय. अस्लम खान या कणखर महिला पोलिस ऑफिसरचा जीवनप्रवासही थक्क करणारा असाच आहे. अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या अस्लम खान यांनी कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच उच्चशिक्षण घेत पोलीस खात्यात मोठ्या पदापर्यंत मजल मारली.

नावाची गोष्ट

अस्लम हे सहसा पुरुषाचं नाव. मात्र या नावाची लेडी सिंघम गोव्यात पुन्हा परतलीय. आर्मी ऑफिसर असलेल्या वडिलांनी लाडानं मुलाचं नाव मुलीला ठेवलं आणि मुलासारखं वाढवलं देखील. आयपीएस अधिकारी अस्लम खान यांचा जीवनपट रोमांचक असाच आहे. बालपणात गरिबीचा अनुभव गाठीशी घेऊनच त्यांनी कणखरपणे पुढे वाटचाल केली. अस्लम खान यांचा शैक्षणिक प्रवास ध्येयानं प्रेरित होऊनच झाला. या प्रवासात त्यांना वडिलांचा नेहमीच पाठिंबा मिळाला.

हेही वाचा – CA ते IAS प्रवास करणाऱ्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कत्याल

लहानपणी वाढदिवस साजरा करण्यासाठीही पैसे नव्हते

परीक्षेच्या आधी एक महिना घराबाहेर न पडता सलग अभ्यास करणं हा अस्लम खान यांचा शिरस्ता. याच सवयीमुळे त्यांनी अनेक परीक्षांत घवघवीत यश संपादन केलं. गरिबीतून अस्लम खान यांनी अगदी जवळून पाहिली. सहावीत असताना वाढदिवसाला शाळेत मित्रमैत्रिणींना वाटण्यासाठी अस्लम खान यांनी चॉकलेट्स न्यायची इच्छा झाली होती. तशी मागणीही त्यांनी आपल्या वडिलांकडे केली होती. पण वडिलांनी पैसे नसल्याचं कारण सांगितल्यानं अस्लम खान यांनी तेव्हा वाढदिवस साजरा करता आला नव्हता.

हुजरेगिरीला थारा नाही

दुसर्‍या कोणासाठी मी स्वत:ला नाही बदलू शकत, असं ही महिला अधिकारी प्रामाणिकपणे सांगते. अनेक वेळा तडजोडी करण्याची वेळ आली, पण मी डगमगले नाही, असं त्या सांगतात. सरकारी नोकरी असो की कुठलीही नोकरी. काहींच्या अंगवळणी पडणारी हुजरेगिरी मात्र अस्लम खान यांना कधीच जमली नाही. आपण आतापर्यंतच्या नोकरीत कधीच हुजरेगिरी केली नाही, असं त्या ठामपणे सांगतात.

हेही वाचा – Video | Murder | Live Video of Attack | धक्कादायक! भररस्त्यात अनवरला पळवून पळवून मारलं

सामाजिक भान

दिल्लीत पोस्टिंगवर असताना अस्लम खान यांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग आला. ट्रक ड्रायव्हरला काही गुंडांनी पैशांसाठी ठार मारलं. या ट्रक ड्रायव्हरच्या कुटुंबाला त्यामुळे मोठा धक्का बसला. पण अस्लम खान यांनी त्यांचं दु:ख हलकं करण्याचा ध्यास घेतला.

हेही वाचा – Breaking | Poitics | Viral Audio Clipमुळे काँग्रेसच्या वर्तुळात एकच खळबळ

नावानं आणि धर्मानं मुस्लीम असणारी ही महिला पोलिस ऑफिसर दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी पंकजकुमार सिंग यांची पत्नी आहे. लग्नानंतर अस्लम खान यांनी नाव बदललं नाही. सामाजिक जीवन जगताना आणि सरकारी नोकरी करताना त्यांनी धर्माच्या भिंतींना जुमानलं नाही. कसल्याच तडजोडी केल्या नाहीत की कोणावर अन्याय केला नाही. अशा प्रामाणिक महिला अधिकार्‍याची गोव्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती होणं, ही गोव्यासाठी निश्चितच चांगली गोष्ट आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!