सांगेच्या ऊस उत्पादकांनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट

ऊस दरासह गूळ निर्मितीवर चर्चा

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपे : सांगे भागातील ऊस उत्पादकांनी कृषीमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर (Babu Kavalekar) यांची भेट घेतली. केपेत झालेल्या या बैठकीत ऊस उत्पादकांच्या अडकलेल्या ६०० रुपये प्रती टन दरावर चर्चा झाली. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग मोकळा करण्यात येणार, असे आश्वासन दिले.

केपे भागात होऊ घातलेल्या बार्शे गूळ शेतकरी उत्पादक कंपनीला संलग्न होण्यास हे शेतकरी इच्छूक आहेत. या कंपनीत सेंद्रिय पद्धतीचा आरोग्याला उपयोगी असा गूळ पारंपरिक पद्धतीने निर्मिला जाणार आहे. सध्या बार्शेतील काही शेतकरी या गुळाची निर्मिती करतात. तसेच सांगे भागात काही प्रमाणात हा गूळ बनवला जातो.

उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीला हर्षद प्रभुदेसाई, फ्रान्सिस उर्फ आयेतीन मास्कारेन्हस, दयानंद फळदेसाई, प्रेमानंद माईणकर, बॉस्त्याव सिमोइश उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!