Photostory | काही फोटो बातमीच्या पलीकडचं सांगतात, त्यासाठी हे पाहावंच लागेल!
नारायण पिसुर्लेकर यांची खास फोटोस्टोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी
एक फोटो शंभर शब्दांपेक्षा जास्त बोलतो, असं म्हणतात. खरंच आहे ते. त्यामुळे यावेळी आम्ही शब्दांपेक्षा फोटोतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेतून महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. मात्र महत्त्वाचं म्हणजे सभागृहातील कामकाजासोबतच सभागृहातील काही फोटो खास गोष्टी सांगून गेल्या. त्यांना शब्दात बांधता येऊ शकत नाही. म्हणून ही खास फोटोस्टोरी.. या खास फोटोस्टोरीसाठी आम्ही दिलेले कॅप्शन त्या फोटोची गंमत आणखी वाढावी म्हणून आहेत… फोटोचा, घडामोडींचा आणि कॅप्शनचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नका. आणि केलातच तर काही संबंध संबंध आढळल्यात तो निव्वळ योगायोग समजावा.
आतमध्ये काय बोलायचं माहीत आहे नं…

या कानाची खबर त्या कानाला नको!

दुसऱ्याला एक बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे

मोडेल पण वाकणार नाही

कागदावर लिहिलेला शब्द म्हणजे धनुष्यातून निघालेला बाणच जणू

खरंच आज कामकाज खूप वेळ चालणार?

कधी काळी उत्तरं देत होतो.. आज प्रश्नांनी घेरलंय

आमचं कुणी ऐकणार आहे की नाही?

जेवायची वेळ झाली वाटते…

प्रॉब्लेम महत्त्वाचा की सोल्युशन?

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

चुकीला माफी नाही… म्हणजे नाही!

एकदाच सांगणार.. पहिलं आणि शेवटचं!

ओरडायचं नाही, आधीच सांगतो!

संत तुकाराम महाराजही असेच अभंग म्हणायचे… पण प्रेमाचे

पूर्ण तयारीनिशी आलोय.. विचारा कायपण!

श्री बोडगेश्वर महाराज की जय…

राजकारण पुरे.. देवपुजा महत्त्वाची

एक दिवा भक्तीचा.. आस्थेचा आणि श्रद्धेचा

उत्साहात जत्रेला सुरुवात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.