पेडण्यातील मोरजी बाजारपेठेत मास्क, सॅनिटायझरचे वितरण

गरजू शेतकऱ्यांना खताचेही वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : करोना महामारीची भीती आजही जनतेमध्ये आहे. अजूनपर्यंत यावर लस उपलब्ध झालेली नाही. आताही जनतेलाच आपली काळजी घ्यावी लागणार आहे. करोनापासून बचावासाठी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे, सॅनिटायझरने हात धुणे आदी कृती केल्या पाहिजेत. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून करोना टाळा, असे आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस सचिन परब यांनी केले.

मांद्रे गट काँग्रेसतर्फे युवा उद्योजक सचिन परब यांनी मोरजी बाजारपेठेत दुकानदार आणि ग्राहकांना मोफत मास्क आणि सॅनिटायझर यांचे वितरण केले. या जागृत्ती उपक्रमात सचिव प्रमेश मयेकर, सूरज रेडकर, विल्सन फर्नांडिस, वैभव आजगावकर, प्रदीप हरमलकर, सत्यवान शेटगावकर, आबा शेटगावकर, काना शेटगावकर आदी सहभागी झाले होते.
मांद्रे मतदार संघातील केरी तेरेखोल, पालये, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, पार्से, तुये आणि विर्नोडा पंचायत क्षेत्रांत 400 पेक्षा जास्त दुकानदार आणि नागरिकांना मास्कचे वितरण करण्यात आले आहे. गरजू शेतकर्‍यांना त्यांनी खताचेही वितरण केले आहे.

हेही वाचा

1 कोटीचे ड्रग्ज जप्त, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई

मोठा दिलासा! ‘या’ महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार

गोवा गोमंतकीयांसाठी, अदानींसाठी नव्हे! आम आदमी पक्षानं सुनावलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!