मडगाव, न्हावशीत जनआक्रोश

कोळसा प्रकल्प, डबल ट्रॅकिंग, मरिनाविरोधात लोकांचा एल्गार

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : लोकांना नको असलेले प्रकल्प माथी मारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी नागरिकांनी मडगाव आणि न्हावशीत एल्गार केला. कोळसा प्रकल्प आणि रेल्वेच्या डबल ट्रॅकिंगला विरोध दर्शवण्यासाठी मडगावात जाहीर सभेला शेकडो लोकांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे, मरिना प्रकल्पाविरोधात लोकांनी उत्स्फूर्तपणे रॅली काढली.

न्हावशीतील मरिना प्रकल्पाला प्राणपणानं विरोध करण्याचा चंग स्थानिकांनी बांधलाय. त्यासाठी शेकडो नागरिक वाहनं घेउन रस्त्यावर उतरले. हातात फलक घेउन लोकांनी उत्स्फूर्तपणे रॅली काढून मरिनाला विरोध दर्शवला. दुसरीकडे, मडगावात कोळसा प्रकल्प आणि रेल्वेच्या डबल ट्रॅकिंगविरोधात सभेला लोकांनी गर्दी केली. यावेळी प्रकल्पाच्या विरोधात आणि गोव्याच्या हिताच्या दृष्टीनं मान्यवरांनी मतं मांडली.

पहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!