वालोर! फोंड्यातील 11 वर्षांच्या अनन्या नाईकची गुगल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक

जी माने गुगल.. जी माने जिनीयस

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : 11 वर्षांची अनन्या नाईक. आपल्या गोव्यातलीच. मूळची फोंड्याची. तिनं एक जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑल इंडिया गुगल्स कोड टू लर्न कॉन्टेस्टच्या अंतिम फेरीत तिनं धडक दिली आहे. डॉक्टर अमित नाईक आणि आर्या खेडेकर यांनी कन्या असलेल्या अनन्यानं राज्याचं नाव मोठं केलंय.

टीव्हीवर सध्या तुम्ही ऋतिक रोशच्या जाहिराती पाहत असालच. यात तुम्हाला कोडींग संबंधी जाहिरीत बघायला मिळतात. लहान लहान मुलं कोडींग शिकू लागली आहे. इंटरनेटच्या जगात कोडींगं महत्त्व तसं खूपच आहे. कोडींग शिकलेल्यांना भविष्यात मोठी संधीही आहे. अशातच कोडींगच्या स्पर्धेत गोव्याच्या फोंड्यातील चिमुकलीनं कमाल कामगिरी केली आहे.

ऑल इंडिया गुगल्स कोड टू लर्न कॉन्टेस्टमध्ये देशभरातल्या मुलांनी सहभाग घेतला होता. त्या सगळ्यांना मागे टाकत आपल्या गोव्याची चिमुकली अनन्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आणि तिच्या पालकांना शुभेच्छा दिल्यात. तिच्या उज्जल भविष्यासाठी संपूर्ण गोव्यातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आहे.

Congratulations to Miss Ananya Naik, a 11 year old student from Goa for entering the finals of All India Google’s Code…

Posted by Dr. Pramod Sawant on Tuesday, 19 January 2021
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!