आपला तालुका आपली बातमी | 12 तालुक्यांच्या 12 घडामोडी एका क्लिकवर

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

फोंडा – शिरोडकरांचा सर्वांगिण विकास कुठे पोहोचला?

शिरोडा मतदारसंघात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा, आमदार सुभाष शिरोडकरांचा सर्वांगिण विकास कुठे पोहोचला, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयदीप शिरोडकरांची टीका

सासष्टी – कुंकळ्ळीत अर्भकाच्या खूनप्रकरणी गुन्हा नोंद

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांपूर्वी मृत अर्भक मिळालं, अर्भकाचा खून करून ते फेकण्यात आलं असल्याचं निष्पन्न, पोलिसांकडून या प्रकारावर खुनाचा गुन्हा नोंद

डिचोली – मुख्यमंत्र्यांना लक्ष करणं चुकीचं

साखळी पालिकेतील विविध घडामोडींवर मुख्यमंत्र्यांना लक्ष करणं चुकीचं, भाजप गटाच्या नगरसेवकांची धर्मेश सगलांनीवर टीका

तिसवाडी – दोघा संशयितांना अटक

नागाळी ताळगांव चाकू हल्लाप्रकरणी दोघा संशयितांना अटक, दीपेश काणकोणकर आणि परी पंडित पोलिसांच्या ताब्यात, विष्णु कुट्टीकरांवर केला होता चाकू हल्ला

सत्तरी – वाळपई नवीन बसस्थानक ठरतंय पांढरा हत्ती

वाळपई नवीन बसस्थानक ठरतंय पांढरा हत्ती, पुरेशा बसेस नसल्याने प्रवाशांनी फिरवली वाळपई बसस्थानकाकडे पाठ, तर शहरातील वाहतूक कोंडी कायम, वाहतूक आराखडा नसल्याने समस्या आणखीन तीव्र

मुरगांव – पालिका निवडणूक प्रचाराचा वेग वाढला

मुरगांव पालिका निवडणूक प्रचाराचा वेग वाढला; प्रचार फेरी, कोपरा बैठका, वैयक्तिक गाठीभेटींवर उमेदवारांचा भर

बार्देश – पाणी जपून वापरा

पुढील 8 दिवस बार्देश तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा, स्थलांतरित पाण्याच्या पाईपलाईनला गळती, म्हापशात करासवाड्याजवळील महामार्गाच्या कामामुळे दुसरीकडे शिफ्ट केली होती पाईपलाईन

पेडणे – टॅक्सी व्यावसायिकांच्या मागण्या मान्य करा

पेडण्यात एक दिवसीय धरणे आंदोलन, आझाद मैदानावरील टॅक्सी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पेडणेवासी उतरले रस्त्यावर, टॅक्सी व्यवसायिकांच्या प्रश्न लवकर सोडवण्याची पेडणेवासियांकडून मागणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!