डिचोली पोलिसांची कर्नाटकात जाऊन कारवाई, चोरीचा छडा लावण्यात यश

सीसीटीव्हीच्या मदतीनं 2 चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. भर दिवसा घरात घुसून चोरी करण्यांना बेड्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली: 25 सप्टेंबर 2020 रोजी बागवाडा अस्नोडा येथील रिशा सिध्देश पेडणेकर यांच्या रहात्या चोरी झाली. चोरांनी घरात घुसून अडीच लाखांचे दागिने पळवले. यात दोन घडळ्यांचाही समावेश होता. याबाबत रितसर तक्रार दाखल झाल्यानंतर डिचोली पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात पोलिसांना मुळगाव वनखात्याच्या सीसीटीव्हीत दोघे जण मोटारसायकलवरुन संशयास्पदरीत्या फिरताना दिसले.

आणि चोरांच्या मुसक्या आवळल्या
पुढील तपासात पोलिसांना ही मोटारसायकल मांगोरहील वास्को येथील इस्माय दत्तागीर साब शेख या कामगाराची असल्याचं कळलं. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. या गुन्ह्यात आपल्याला परशुराम बुध्दाप्पा ओलेकर याचीही साथ मिळाल्याची त्यानं कबूली दिली. डिचोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता परशुराम ओलेकर कर्नाटकालीत आपल्या मूळ घरी विजयपूर येथे गेल्याचे समजलं. डिचोली पोलिसांनी तिथं जाऊन परशुराम ओलेकरच्या मुसक्या आवळल्यात. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.

अबब…दोघांकडून एवढे दागिने जप्त
पोलिसांनी दोघांकडून 3 सोन्याची काकणं, 1 सोन्याचा हार, 3 कानातले रिंगाच्या जोड्या, 3 ब्रेसलेट, 2 कानातील रींग, 1 सोन्याचे लॉकेट आणि 1 सोन्याची टायपीन इतका ऐवज जप्त केलाय.

या तपासात डिचोली पोलिस स्टेशनचे पीएसआय दिपेश शेटकर, पीएसआय प्रसाद पाळणी, पोलिस कॉन्सटेबल रणधीर बाळे, अक्षय तिरोडकर, गौरव वायंगणकर, प्रवीण नानोस्कर, विजय मांद्रेकर, संदीप पावले, देवराय कारबोटकर, ड्रायव्हर विजय करमलकर या सर्वांनी महत्वाची भूमिका निभावली. उपअधिकक्षक गुरुदास गावडे यांच्या मार्दगर्शनाखाली मनीषा पेडणेकर पुढील तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!