आपला तालुका आपली बातमी | 12 तालुक्यांच्या 12 घडामोडी एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरी – सातेरी ब्राम्हणी महादेव देवस्थानाचा जत्रोत्सव

सत्तरी तालुक्यातील नाणूस येथील सातेरी ब्राम्हणी महादेव देवस्थानाचा जत्रोत्सव 17 एप्रिलला, जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे शंभर धोंडगण जत्रोत्सवात अग्निदिव्य पार करणार

डिचोली – सव्वा कोटींचा रस्ता

अडवलपाल येथील धनगरवाडीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात, सभापती राजेश पाटणेकरांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ, सव्वा कोटी रुपये खर्चून हा नवा रस्ता तयार करणार

पेडणे – पानी रे पानी

पेडण्यात तीव्र पाणी टंचाई, चांदेल पाणी प्रकल्पाचा विस्तार अतिशय संथ गतीने सुरू, पेडणे तालुक्यात लाखभर लोकसंख्या, तर पर्यटन हंगामात त्यात आणखीन लाखांची भर

बार्देस – तामोझिन कार्दोजची पंचाहत्तरी

तियात्र, मांडो तसंच गोव्याची सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यात तामोझिन कार्दोज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, मंत्री मायकल लोबोंचं प्रतिपादन, कार्दोज यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त कांदोळीतील एका रस्त्याला दिले त्यांचे नाव

तिसवाडी – व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतिक्षा

तिसवाडी तालुक्यातील मिठागारात स्थानिक व्यवसायिकांनी यंदाही पीक काढले, व्यावसायिकांना आता ग्राहकांची प्रतिक्षा, गावठी मिठाला गोव्यात जोरदार मागणी असायची, मात्र कोरोना महामारीमुळे या व्यवसायाला मोठा फटका

मुरगांव – माझ्यामुळेच विकास

दाबोळी मतदारसंघात उत्तम रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी सदैव पुढाकार घेतल्यानेच येथे रस्त्यांची स्थिती चांगली, मंत्री मॉविन गुदिन्होंचा विश्वास, चिखली जंक्शन ते दाबोळी विमानतळाच्या बाहेरील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला गुरुवारी प्रारंभ, मंत्री गुदिन्होंच्या हस्ते कामाचे उद्घाटन

सासष्टी – कचरा शुल्क वाढीचा निर्णय आमचे नव्हे

कुंकळ्ळी पालिकेच्या विद्यमान पालिका मंडळाने कसल्याही प्रकारचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला नाही, कचरा शुल्क वाढलेले असल्यास तो निर्णय गत पालिका मंडळाचा, नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांची स्पष्टोक्ती

फोंडा – काम संपता संपेना

५ वर्षांपासून सुरु असलेल्या फोंड्यातील मलनिस्सारण प्रकल्पांचे काम संपता संपेना, प्रकल्प बनला वाहन चालकांसाठी डोकेदुखी

धारबांदोडा – कुळेत क्षयरोगाबाबात जागृती

पिळये धारबांदोडा आरोग्य केंद्रातर्फे कुळे येथे क्षयरोगाबाबात जागृती, प्राथमिक विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला डॉ. रेणुका चव्हाणांनी केलं मार्गदर्शन

केपे – ईस्ट केपे कंझ्युमर्स को.ऑप. सोसायटी लि.च्या निवडणुकीचा निकाल

कुडचडे येथील ईस्ट केपे कंझ्युमर्स को.ऑप. सोसायटी लि. या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल पार पडला, एका गटाचे ८ उमेदवार, तर दुसऱ्या गटाचे दोन उमेदवार विजयी

सांगे – सायशक्ती वॉरियर्सची विजयश्री

नेत्रावळी येथे सांगे ग्रामिण चॅम्पियन लीग २०२१चे यशस्वीरित्या आयोजन, स्पर्धेत सायशक्ती वॉरियर्स संघ विजयी, तर भूतो वॉरियर्स उपविजेते

काणकोण – संगीता मित्रांचा काणकोण दौरा

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या जेष्ठ सल्लागार संगीता मित्रा यांचा काणकोण दौरा, श्रीस्थळ काणकोण येथील जैवविविधता समितीच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट, भेटीत जाणून घेतल्या समितीच्या समस्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!