एक दोन नव्हे, म्हादईवर ‘इतक्या’ धरणांचा प्रस्ताव

डब्ल्यूआरडी खात्याने केली प्रक्रिया सुरू3823

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : म्हादई नदीवर 10 लहान धरणं बांधायचा गोवा सरकारचा विचार आहे. यासाठीचे माती परीक्षण पुढील दोन महिन्यात करण्यात येईल. राज्यातील 3 तालुक्यातून वाहणाऱ्या म्हादईवर ही 10 धरणं आहेत.

म्हादईच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी 1999मध्ये मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. या मास्टरप्लॅनमध्ये 61 धरण बांधण्याची सूचना केली होती. आमठाणे आणि अंजुणे ही धरणे पूर्ण झालीत. बाकीची 59 धरणं बाकी आहेत. यातील 10 धरणं बांधायला प्राधान्य दिलंय. आणि या विषयीची प्रक्रिया सुरू झाल्याचेही डब्ल्यूआरडीखात्याचा अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या ठिकाणी म्हादईवर 10 धरणांचा प्रस्ताव

1. सत्तरी तालुक्यात- गोळावली, डोंगुरवाडो, झर्मे आणि केरी
2. धारबांदोडा तालुक्यात- काजूमळ, सुकतळी, तातोडी
3. फोंडा तालुक्यात- निरंकाल, कोडार

म्हादईवरील सुनावणी लांबणीवर

म्हादईचा वाद सुप्रीम कोर्टात आहे. कणकुंबीतून कर्नाटक म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कर्नाटकने सुप्रीम कोर्टाला न जुमानता काम चालूच ठेवलं आहे. या संबंधी गोवा सरकारने कर्नाटकविरुध्द अवमान याचिका दाखल केल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाने म्हादईची सुनावणी लांबणीवर टाकत नोव्हेंबरपर्यंत स्थगित ठेवलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!