पेडणे वॉरीअर्स ठरले अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा प्रिमिअर लीगचे विजते

फातोर्ड्यात शानदार टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज यांनी फातोर्डा येथे आयोजित केलेल्या टेनिसबॉल प्रीमीअर लीग क्रिकेट स्पर्धेत मराठा वॉरीअर्स पेडणे संघाने विजेतेपद पटकावले. 1,00,096 रोख आणि चषक विजेत्यांना प्राप्त झाले. मि. 36 डिचोली संघ उपविजेता तर केपे संघाला तिसरे स्थान प्राप्त झाले. युवकांनी क्रीडा प्रकारांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन तंदुरूस्ती राखावी. क्रीडापटूंना होईल तशी मदत आणि प्रोत्साहन आपण देणार अशी ग्वाही कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली.

Rajesh Faldessai denies split in Congress


समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई, एजीकेएसएमचे अध्यक्ष तथा निवृत्त पोलिस अधिक्षक महेश कृष्णा नाईक गावकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी कुंभारजुवेच्या आमदारांनी 1,00,096 रुपयांचे पहिले बक्षीस व मालिकावीरासाठीचे सुवर्ण नाणे पुरस्कृत केले होते. पुढील वर्षी प्रत्येक सामनावीरासाठी 1 ग्रामचे नाणे पुरस्कृत करणार असल्याचे आश्वासन फळदेसाई यांनी दिले.


फक्त क्रिकेटच नव्हे तर गोव्याचा लोकप्रिय फुटबॉल स्पर्धेचेही आयोजन व्हायला हवे असे सांगून आपण सहकार्य करण्यास तयार आहे, असेही आमदार राजेश फळदेसाई म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मोहीम सुरू केलीए. देशाची तरूणाई तंदुरूस्त असेल तरच देश तंदुरूस्त आणि बलवान बनू शकेल,असेही फळदेसाई म्हणाले. खेळाडूंनी क्रीडा प्रकारांत यश मिळून शिखर गाठण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. आम्हाला आमचे खेळाडू हे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले पहायला नक्कीच आवडेल. खेळाडूंनी मेहनत घेतल्याच इंडियन प्रीमियर लीगचे दार देखील त्यांना उघडे होऊ शकते. आम्ही खेळाडूंना प्रेरणा देऊन त्यांच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे. क्रीडा क्षेत्रासाठी सध्या अद्ययावत साधनसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आम्ही तुम्हाला सहाय्य करू, आम्ही शिक्षण क्षेत्रातही तुमचे अडथळे दूर करू, असे ते म्हणाले.

स्पर्धेचे भव्य बक्षीस पुरस्कृत करून खेळाडूंना प्रेरणा दिल्याबद्दल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कुंभारजुव्याच्या आमदारांचे कौतुक केले. आमच्या युवांमध्ये टॅलेंटची कमी नाही. त्यांच्या क्षमता, कौशल्य, उर्जा ठासून भरली आहे. हार न मानण्याची वृत्ती अंगी बाणवल्यास यश आपोआप मिळत जाते, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक करताना खेळाडूंची मेहनतीसाठी प्रशंसादेखील केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!