झुआरी एग्रो केमिकल्सने दिले 50 ऑक्सिजन सिलिंडर

दक्षिण गोव्याच 5 सरकारी आरोग्य केंद्रांना दिली ऑक्सिजन सिलिंडरची मदत

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः झुआरीनगरच्या झुआरी एग्रो केमिकल्स लिमिटेडने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर)अंतर्गत दक्षिण गोव्यातील पाच सरकारी आरोग्य केंद्रांना प्रत्येकी सात घनमीटर क्षमतेचे एकूण 50 ऑक्सिजन सिलिंडर दिलेत. एका साध्या सोहळ्यात कंपनीचे चीफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफिसर नीलेश देसाई यांनी दक्षिण गोवाच्या जिल्हाधिकारी रुचिका कटयाल यांच्याकडे सदर सिलिंडर दिले. याप्रसंगी आरोग्य खात्याच्या उपसंचालक अंजेलिका गोम्स उपस्थित होत्या.

हेही वाचाः भारतीय सेना ही जगात उत्कृष्ट सेना मानली जाते

सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून उचललं पाऊल

कोविड-19 चा प्रसार कंपनीच्या आवारात, आसपासच्या परिसरामध्ये होऊ नये यासाठी झुआरी एग्रो केमिकल्स लिमिटेडने पहिल्यापासून निरनिराळ्या प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकांसमोर आरोग्यविषयक समस्या विशेषतः ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा पुरेशा मिळण्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंबंधी दखल घेताना सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून कंपनीने 50 ऑक्सिजन सिलिंडर दिले. काणकोण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र कासावली, प्राथमिक आरोग्य केंद्र केपे, कुडचडे आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र सांगे येथे प्रत्येकी दहा सिलिंडर देण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!