मराठी साहित्य-कला क्षेत्रात वावरणाऱ्या नवयुवकांसाठी ‘युवाविष्कार’

पणजीतील कला व संस्कृती भवनात ७ मार्चला कार्यक्रमाचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मराठी साहित्य व कला क्षेत्रात वावरणाऱ्या नवयुवकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गोवा मराठी अकादमीच्या युवा विभागाने,”युवाविष्कार” या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. रविवार ७ मार्चला हा कार्यक्रम पणजीतील कला व संस्कृती भवनात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० ते सायं ५ या वेळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

विविध कार्यक्रमांची मेजवानी

यामधील ‘भावतरंग : ललित साहित्याचा आविष्कार’ या सत्रात स्वलिखित ललित गद्याचं वाचन करण्याची संधी नवीन लिहित्या हातांना साद घालतेय. दुसऱ्या सत्रात ‘नाट्य दर्पण’ हा कार्यक्रम होईल. यामध्ये अभिजात नाटकातील एकपात्री नाट्यांश सादर केले जातील. ‘काव्यमाला’ या तिसऱ्या सत्रात नवोदित युवक कवींचं कविसंमेलन होईल. समारोपाच्या सत्रात ‘स्वराभिषेक’ ही संगीतमय मैफल होईल. यात बा.भ.बोरकर, शंकर रामाणी, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट आदी प्रसिद्ध कवींच्या रचना सादर करण्यात येतील.

हेही वाचाः मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती देणारे `साहित्यवेदी`

इथे संपर्क करा…

१५ ते २५ या वयोगटातील इच्छुकांनी स्वलिखित ललित लेख, लघुकथा, हृदयस्पर्शी पत्रे अथवा अति लघु कथा (अलक) यातील एखादा प्रकार १ मार्चपर्यंत श्रिया टेंगसे (9834574070) या क्रमांकावर पाठवावा अशी विनंती आहे निवड झालेल्या तरुणांना ७ तारखेच्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी देण्यात येईल. ‘काव्यमाला’ या सत्रासाठी नवोदित कवींनी आपल्या कविता अमेय वरेरकर (7350140270) या क्रमांकावर पाठवाव्यात. निवड झालेल्या कवींना कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जाईल. सोमवार १ मार्च रात्री ८ पर्यंत मिळालेल्या कविता व लेख विचारात घेतले जातील. अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे संयोजक वल्लभ केळकर (8830683842) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन अकादमीचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांनी केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!